शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

रात्रभर डास चावल्यानं मुख्यमंत्री संतापले; अवघ्या ४८ तासांत इंजीनियरवर 'कठोर' कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2021 08:14 IST

मुख्यमंत्र्यांना रात्रभर त्रास झाल्यानं इंजीनियरवर कारवाई; अतिथीगृहात स्वच्छता नसल्यानं कारवाईचे आदेश

नवी दिल्ली: काही दिवसांपूर्वीच मध्य प्रदेशच्या सीधी जिल्ह्यात बस कालव्यात कोसळून ५० प्रवाशांचा मृत्यू झाला. यानंतर राज्याचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान (MP CM Shivraj Singh Chouhan) मृतांच्या कुटुंबांचं सांत्वन करण्यासाठी सीधीमध्ये पोहोचले. त्यावेळी त्यांचा मुक्काम अतिथीगृहात होता. सर्किट हाऊसमध्ये असलेल्या अस्वच्छतेमुळे शिवराज सिंह चौहान यांना रात्रभर डास चावले. याशिवाय टाकीमधून पाणी ओव्हर फ्लो होत होतं. आता या प्रकरणी प्रशासनानं कारवाई केली आहे....अन् एकाच चितेवर पती-पत्नी दोघांवर अंत्यसंस्कार; कुटुंबावर कोसळला दुखा:चा डोंगर रिवा विभागाच्या आयुक्तांनी कारवाईचा आदेश जारी केला आहे. '१७ फेब्रुवारीला एक विशिष्ट अतिथी सीधी जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. ते सर्किट हाऊसमध्ये विश्रांतीसाठी थांबले. याची पूर्वसूचना सर्किट हाऊसचे प्रभारी बाबूलाल गुप्ता यांना देण्यात आली होती. मात्र सर्किट हाऊस आणि परिसरात अस्वच्छता होती,' असं आयुक्तांनी त्यांच्या आदेशात म्हटलं आहे. कर्तव्यात कसूर केल्याबद्दल गुप्ता यांना निलंबित करण्यात आलं आहे.बस बुडत असताना या मुलीने प्रसंगावधान दाखवले, भावासोबत मिळून अनेकांचे प्राण वाचवले'सर्किट हाऊसमधील पाण्याची टाकी ओव्हरफ्लो होत होती. खोलीत डास असल्याची तक्रारदेखील प्राप्त झाली आहे. यातून अतिथीगृहाची देखभाल व्यवस्थित झाली नसल्याचं स्पष्ट होतं. गुप्ता यांनी त्यांचं काम नीट न केलं नाही. त्यामुळे विशिष्ट अतिथींना त्रास झाला. गुप्ता यांच्यामुळे जिल्हा प्रशासनाची प्रतिमा डागाळली. हा शुद्ध बेजबाबदारपणा आहे. त्यामुळे त्यांना निलंबित केलं जात आहे,' असं आदेशात नमूद करण्यात आलं आहे.सीधी जिल्ह्यात बसला भीषण अपघात झाल्यानं मुख्यमंत्री चौहान जिल्ह्यात आले होते. सीधी जिल्हा मुख्यालयापासून ८० किलोमीटर दूर असलेल्या पटना गावाजवळ मंगळवारी सकाळी बसला अपघात झाला. यामध्ये ५१ जणांचा मृत्यू झाला. बस थेट कालव्यात कोसळल्यानं ही दुर्घटना घडली. या अपघातासाठी जबाबदार असलेल्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं आश्वासन चौहान यांनी त्यांच्या दौऱ्यादरम्यान दिलं.

टॅग्स :shivraj singh chauhanशिवराज सिंह चौहानMadhya Pradeshमध्य प्रदेश