शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

Jammu And Kashmir : शोपियान चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 13, 2019 10:08 IST

जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी (13  एप्रिल) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे.

ठळक मुद्देजम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवारी पहाटेपासून चकमक सुरू आहे. चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले.परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.

श्रीनगर - जम्मू-काश्मीरच्या शोपियान जिल्ह्यामध्ये जवान आणि दहशतवाद्यांमध्ये शनिवार (13  एप्रिल) पहाटेपासून चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली असल्याने शोधमोहीम सुरू आहे.

सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये शोपियनमध्ये शनिवारी चकमक सुरू झाली. परिसरात काही दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यामुळे जवानांनी या परिसराला घेराव घातला. त्यानंतर परिसरात शोध मोहीम सुरू करण्यात आली आहे. यावेळी दोन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला असून त्यांच्या गोळीबाराला जवानांकडून चोख प्रत्युत्तर दिले जात आहे.

जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये मंगळवारी (9 एप्रिल) दहशतवाद्यांनी रुग्णालयात घुसून फार्मासिस्ट आणि RSS नेत्याची हत्या केली होती. यावेळी सुरक्षेसाठी तैनात असलेल्या जवानावरही गोळ्या झाडण्यात आल्या होत्या. गंभीर जखमी असलेल्या आरएसएस नेत्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र आरएसएस नेत्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. तर पीएसओ जवान या गोळीबारात शहीद झाला आहे. मंगळवारी दुपारी किश्तवाडमध्ये दहशतवाद्यांनी घुसून फार्मासिस्ट व आरएसएस नेते चंद्रकांत शर्मा आणि त्यांचे पीएसओ यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. पीएसओ जवान घटनास्थळीच शहीद झाला.  RSS नेत्याला एअरलिफ्ट करून गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज(जीएमसी)मध्ये आणण्यात आलं होतं. उपचारादरम्यान त्यांचाही मृत्यू झाला. 

Jammu And Kashmir : त्रालमध्ये जवानांनी 2 ते 3 दहशतवाद्यांना घेरले

जम्मू काश्मीरच्या त्रालमध्ये रविवारी (7 एप्रिल) पहाटेपासून दहशतवादी आणि जवानांमध्ये चकमक सुरू होती. या परिसरात जैश ए मोहम्मदचे 3 दहशतवादी लपले असण्याची शक्यता वर्तवण्यात आली होती. सुरक्षा दलांच्या जवानांनी दोन ते तीन दहशतवाद्यांना घेरल्याची माहिती मिळली होती. त्राल भागात काही दहशतवादी लपल्याची माहिती जवानांना मिळाली. त्यानूसार 42 राष्ट्रीय रायफलचे जवान, सीआरपीएफच्या 180 बटालीयनचे जवान आणि जम्मू काश्मीर पोलीस यांच्या संयुक्त पथकाने या परिसराला घेराव घातला आहे. जवानांकडून शोध मोहीम राबविण्यात आली असता दहशतवाद्यांकडून गोळीबार करण्यात आला. त्यावेळी जवानांनी देखील त्यांना उत्तर देत गोळीबार सुरू केला होता.  

शनिवारी (6 एप्रिल) शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात झालेल्या चकमकीत लष्कराला दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले आहे. शोपियान जिल्ह्यातील इमाम साहिब परिसरात दहशतवादी लपल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने या परिसराला घेराव घातला. त्यानंतर दोन्हीकडून गोळीबारास सुरुवात झाली. अखेरीस लष्कराने लपून बसलेल्या दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आले. याआधी पुलवामा जिल्ह्यात याच आठवड्यात झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी चार दहशतवाद्यांना ठार केले होते. त्या चकमकीत लष्कराचे तीन जवान आणि एक पोलीस कर्मचारी जखमी झाला होता. त्याआधी गेल्या आठवड्याच शोपियान जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांना जवानांनी कंठस्नान घातले होते.  

दहशतवाद्यांनी केली सुट्टीवर आलेल्या जवानाची हत्या, कुटुंबीयांसमोरच झाडल्या गोळ्या

काश्मीरमधील सोपोर भागात दहशतवाद्यांनी केलेल्या गोळीबारात लष्कराच्या जवानाचा मृत्यू झाला आहे. मोहम्मद रफी यातू असं या जवानाचे नाव असून त्याच्या कुटुंबीयांसमोर त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. रफी हा सुट्टीसाठी त्याच्या सोपोरमधील वारपोरा गावी आला होता.

भारतीय सैन्याकडून लष्कर-ए-तोएबाच्या 4 दहशतवाद्यांचा खात्मा

पुलवामा येथील लस्सीपुरा भागात काही दिवसांपूर्वी सुरक्षा यंत्रणा आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू होती. चकमकीत 4 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात भारतीय जवानांना यश आलं असून दहशतवाद्यांकडून अनेक हत्यारे जप्त करण्यात आली होती. लष्कर ए तोएबाच्या 4 दहशतवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले होते. मृत दहशतवाद्यांकडून 2 एके रायफल्स, 1 एसएलआर आणि 1 पिस्तुल जप्त करण्यात आली होती. दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत 3 जखमी झाले होते तसेच त्यांच्यावर नजीकच्या रुग्णालयात उपचार सुरू होते.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादी