शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

अवंतीपोरा येथे चकमक, एका दहशतवाद्याला कंठस्नान 

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 8, 2019 08:36 IST

काश्मीरमधील अवंतीपोरा येथे झालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे.

श्रीनगर - काश्मीरमधील अवंतीपोरा येथे झालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. अवंतीपोरा भागात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर लष्कराने परिसराला घेराव घातला. त्यानंतर उडालेल्या चकमकीत लष्कराने एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले. परिसरातून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. दरम्यान, परिसरात शोधमोहीम सुरू आहे.   दरम्यान, हिवाळ्याला सुरुवात होण्यापूर्वी जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची मोठ्या प्रमाणावर घुसखोरी घडवून आणण्यासाठी पाकिस्तानने नवे कारस्थान आखल्याचे समोर आले आहे. पाकिस्तानने काश्मीरमध्ये घुसखोरी घडवण्यासाठी नवा मार्ग शोधला आहे. मात्र सिंधू खोऱ्यातील गुरेज विभागातून घुसखोरीच्या प्रयत्नात असलेल्या दोन दहशतवाद्यांना लष्कराने कंठस्नान घातले आहे. या भागातून जवळपास सहा वर्षांनंतर घुसखोरीचा प्रयत्न झाला आहे. 

लष्करामधील सूत्रांनी सांगितले की, घुसखोरीची ही घटना 27 सप्टेंबर आणि 3 ऑक्टोबर रोजी घडली. गेल्या काही वर्षांपासून सिंधू खोऱ्याचा भाग बऱ्यापैकी शांत आहे. येथे दहशतवादाविरोधातील शेवटची मोहीम 2013 मध्ये चालवण्यात आली होती. दरम्यान, ''नियंत्रण रेषेच्या प्रत्येक बाजूने दहशतवाद्यांची घुसखोरी घडवून आणत दहशतवादी कारवायांना प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न पाकिस्तानकडून करण्यात येत आहे. त्यामुळे खोऱ्यातील लोक दहशतीच्या छायेत आहेत. 

 दरम्यान, ग्रेनेड लाँचरसह दोन दहशतवाद्यांनी या भागात केलेली घुसखोरी ही चिंतेची बाब आहे, असे लष्कराचे म्हणले आहे. या परिसरात भटक्या समुदायाची वस्ती आहे. येथील रहिवासी अक्रोड आणि अन्य नैसर्गिक साधनसंत्तीच्या देवाणघेवाणीतून आपला उदरनिर्वाह करतात. सध्या गांदरबल आणि कारगिल येथून आखाती देशात राहणाऱ्या एका व्यक्तीला करण्यात आलेल्या फोन कॉलबाबत अधिक माहिती पोलीस घेत आहे. दरम्यान, ठार  करण्यात आलेल्या दहशतवाद्यांपैकी एकाच्या मृतदेहावर एका कुटुंबाने दावा केला आहे.

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरIndian Armyभारतीय जवानterroristदहशतवादी