श्रीनगर - काश्मीर खोऱ्यातील दहशतवाद्यांविरोधात लष्कराने आक्रमक पवित्रा घेतला असून, शुक्रवारी संध्याकाळी पुलवामा येथे केलेल्या धडाकेबाज कारवाईत लष्कराने तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला. पुलवामामधील छतपोरा भागात लष्कराने या दहशतवाद्यांना कंठस्नान घातले असून, या कारवाईनंतर परिसरामध्ये मोठी शोधमोहीम हाती घेण्यात आली आहे. तसेच कारवाईदरम्यान परिसरातील इंटरनेटसेवा खंडित करण्यात आली आहे.
पुलवामामध्ये लष्कराची धडाकेबाज कारवाई, तीन दहशतवाद्यांचा खात्मा
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 29, 2018 21:04 IST