शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

पुलवामामध्ये मोठी चकमक; टॉप कमांडर रियाझ अहमद डारसह आणखी एकाला कंठस्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 17:39 IST

जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये झालेल्या चकमकीत दोन दशतवाद्यांचा भारतीय लष्कराने खात्मा केला आहे.

Pulwama Encounter : जम्मू काश्मीरच्या पुलवामामध्ये सोमवारी सुरक्षा दलाच्या चकमकीमध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे. पुलवामा जिल्ह्यातील निहामा भागात ही चकमक सुरू होती. दहशतवाद्यांनी आधी सुरक्षा दलावर गोळीबार केला. त्यानंतर भारतीय सुरक्षा दलाने केलेल्या प्रत्युत्तरात दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. सकाळपासून एका घरामध्ये दोन्ही दहशतवादी लपून बसले होते. त्यानंतर कारवाईदरम्यान, घराला आग देखील लागली होती. मात्र आता दोन्ही दहशवाद्यांच्या मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.

जम्मू-काश्मीरमधील निहामा भागात सोमवारी दहशतवादी आणि सुरक्षा दलांमध्ये चकमक झाली. यामध्ये दोन दहशतवाद्यांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आणि कारवाई केली. दहशतवादी ज्या घरात अडकले होते त्या घराला आग लागली होती. त्यामुळे प्रत्येक संशयास्पद हालचालींवर सुरक्षा दलांची नजर होती. त्यानंतर आता चकमकीत लष्करचा एक कमांडर आणि त्याचा एक साथीदार मारला गेला आहे. रियाज अहमद डार असे मृत कमांडरचे नाव आहे.

रियाझ अहमद डार हा डार हा काकापोरा, सातरगुंड येथील रहिवासी होता. तो लष्कर-ए-तोयबाचा टॉप कमांडर होता आणि नऊ वर्षे सक्रिय होता. रियाझ अहमद हा अनेक वर्षांपासून सुरक्षा दलांना हवा होता. त्याच्यावर अनेक खुनात सहभागी असल्याचे आरोप होते. दक्षिण काश्मीरमधील पुलवामा येथील विशेष एनआयए न्यायालयाने रियाझ अहमद डार उर्फ ​​पीर बाबा उर्फ ​​खालिद याला फरार घोषित केले होते. डबल प्लस ए श्रेणीतील दहशतवादी रियाझवर सुरक्षा यंत्रणांनी आधीच १५ लाखांचे बक्षीस जाहीर केले आहे.

सकाळच्या सुमारास काश्मीर पोलीस आणि लष्कराच्या संयुक्त पथकाने निहामामध्ये शोध मोहीम सुरू केली होती. यावेळी एका घरामध्ये लपलेल्या दहशतवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केला. यानंतर दोन्ही बाजूंनी गोळीबार सुरू झाला. गोळीबारानंतर दहशतवादी लपलेल्या घराने पेट घेतला होता. चकमकीत मारला गेलेला टॉप कमांडर रियाझ डार याच्या कुटुंबीयांना चकमकीच्या ठिकाणी आणण्यात आले होते, जेणेकरून तो त्यांच्या विनंतीनुसार आत्मसमर्पण करू शकेल. मात्र त्याने तसे केले नाही. त्यानंतर आता दुपारच्या सुमारास दोन्ही दहशतवादी मारले गेल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली.  

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीIndian Armyभारतीय जवानCrime Newsगुन्हेगारी