शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
3
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
4
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
5
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
6
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
7
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
8
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
9
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
10
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
11
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
12
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
13
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
14
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
15
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
16
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
17
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
18
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
19
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
20
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा जवानांकडून पुलवामा हल्ल्याच्या मास्टरमाइंडसह तीन दहशतवाद्यांचा खात्मा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2019 10:04 IST

दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाचा जवानांनी चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे.

श्रीनगर- दक्षिण काश्मीरमधल्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलाचा जवानांनी चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा केला आहे. या भागात दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर सुरक्षा दलाच्या जवानांनी सर्च ऑपरेशन राबवलं. खात्मा करण्यात आलेल्या दहशतवाद्यांची अद्याप ओळख पटू शकलेली नाही. त्यांच्या जवळून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे.संरक्षण मंत्रालयाच्या प्रवक्त्यांच्या माहितीनुसार, पिंगलिश भागात सर्च ऑपरेशनदरम्यान दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला. त्यानंतर रात्रभर चाललेल्या गोळीबारात तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला. तर दुसरीकडे पुलवामा हल्ल्याचा मास्टरमाइंड असलेल्या जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी मुद्दसिर अहमद खान (23) याचाही खात्मा करण्यात यश आलं आहे. मुद्दसिरनं पुलवामा हल्ल्यादरम्यान गाडी आणि विस्फोटांचा पुरवठा केला होता. मुद्दसिरनं पुलवामातून ग्रॅज्युएशन आणि इलेक्ट्रिशियनचा डिप्लोमाही केला आहे.14 फेब्रुवारी रोजी झालेल्या या हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले होते. एनआयएच्या सूत्रांनी सांगितले की, मुदसिर हा पदवीधर असून त्याने आत्मघाती हल्ला घडविण्यासाठी आदिल या दहशतवाद्याला वाहन व स्फोटके मिळवून दिली होती. त्राल येथील मिर मोहल्ला येथे राहणारा मुदसिरने दोन वर्षांपूर्वी जैश-ए-मोहम्मदसाठी भूमिगत राहून काम करत होता. त्यानंतर त्या संघटनेच्या नूर मोहम्मद तंत्री या दहशतवाद्याच्या गटात तो सक्रिय झाला. काश्मीर खोऱ्यात दहशतवादी कारवाया घडविण्यात नूरचा मोठा हात होता. डिसेंबर 2017मध्ये तंत्री चकमकीत मारला गेल्यानंतर मुदसिर अहमद खान 14 जानेवारी 2018 रोजी घरातून पळून गेला होता. त्यावेळेपासून त्याने दहशतवादी कारवायाही वाढविल्या होत्या. अखेर त्याचा खात्मा करण्यात सुरक्षा जवानांना यश आलं आहे. तसेच सुरक्षा जवानांनी सज्जाद या कुख्यात दहशतवाद्याला ठार केलं आहे. 

आणखी दोन हल्ल्यांतही सामीलमुदसिर याने पदवी मिळविल्यावर आयटीआयमधून त्याने इलेक्ट्रिशियनचा एक वर्षाचा डिप्लोमा पूर्ण केला. गेल्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात संजावान येथे लष्करी तळावर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामागेही त्याचा हात होता.या हल्ल्यात सहा जवान शहीद व एक नागरिक ठार झाला होता. लेथपोरा येथे सीआरपीएफ तळावर जानेवारी 2018मध्ये झालेल्या हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते. या प्रकरणीही तपासयंत्रणांना तो हवा आहे.पुलवामातील हल्ल्याच्या चौकशीसाठी एनआयएच्या पथकाने 27 फेब्रुवारी रोजी मुद्दसिरच्या घरावर धाड टाकली होती. 

टॅग्स :pulwama attackपुलवामा दहशतवादी हल्लाterroristदहशतवादी