शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

सोलापूरचे पापड विदेशी बाजारपेठेत तरुणाने उभारला उद्योग: २३६२ महिलांना रोजगार

By admin | Updated: February 11, 2015 00:33 IST

राजकुमार सारोळे

राजकुमार सारोळे
सोलापूर : सोलापूरच्या पूर्वभागात विडी उद्योगाने जसे अनेकांचे संसार थाटले आहे, तसे आता पश्चिम भागात पापड उद्योगाने २३६२ महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे. ही किमया केली आहे आठवीपर्यंत शिकलेल्या एका बेकार तरुणाने.
सोलापुरातील कापड गिरण्या बंद पडल्यावर अनेक जण बेकार झाले. चादर—टॉवेल आणि विडी उद्योगावर बर्‍याच जणांचा संसार तग धरून राहिला. पूर्व विभागाची ही ओळख देशभर आहे. पण कापड गिरण्या अस्ताला गेल्यावर कामगारांची वस्ती असलेल्या पश्चिम भागात मोठे दारिद्र्य घर करून राहिले आहे. अशाच कुटुंबात वाढलेल्या राजेश लक्ष्मण डोंगरे (रा. लक्ष्मी-विष्णू चाळ) या तरुणाने एक धाडसी प्रयोग केला आहे. पापड उद्योग स्थापन करून त्याने या परिसरातील तब्बल २३६२ महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला आहे.
राजेश डोंगरे यांचे वडील लक्ष्मी-विष्णू मिलमध्ये कामगार होते. त्यांच्या मृत्यूनंतर आई संपदा या वॉचमन म्हणून मिलमध्ये काम करू लागल्या. दोन मुलांचा संसार भागत नसल्याने होमगार्ड म्हणूनही त्यांनी काम केले. होमगार्डचा राजीनामा दिल्यावर पापड करण्याचे त्या काम करायच्या. पुढे मुलगा राजेश हा मोठा झाल्यावर घराशेजारीच असलेल्या लक्ष्मी पापड उद्योगात पीठ मळण्याच्या मशीनवर रोजंदारीवर कामावर जाऊ लागला. पुढे हा उद्योग बंद पडल्यावर तो बेकार झाला. आईने त्याला स्वत:चा पापड उद्योग काढण्याचा सल्ला दिला. पण जवळ पैसे नव्हते. यासाठी तो सगळीकडे फिरला. मुंबईत गणेश पापड उद्योगाच्या कार्यालयात जाऊन त्याने काम मागितले. तेथील संचालकांनी त्याला दिवसभर बसवून ठेवले. पण सायंकाळपर्यंत तो जागचा हलला नाही. त्याची जिद्द पाहून संचालक प्रवीण छेडा यांनी १00 किलो पापड पुरविण्याचे काम दिले. सोलापुरात येऊन राजेश यांनी हे काम नेटाने चालविले. कंपनीने २00, ३00 किलो असे वाढवित साडेतीन वर्षांनंतर आज दररोज ३ टन पापड पुरविण्याची ऑर्डर नोंदविली आहे.
दहा ठिकाणी केंद्रे
राजेश यांची जिद्द पाहून मुंबईतील गणेश पापड उत्पादक कंपनीने मोठी ऑर्डर दिली आहे. कंपनीची मागणी लक्षात घेऊन राजेश यांनी विजया बँकेकडून ७ लाखांचे कर्ज घेऊन लक्ष्मी-विष्णू चाळीत महालक्ष्मी महिला उद्योग स्थापन केला. अद्ययावत मशिनरी आणली. महिलांना काम देण्यासाठी गल्लोगल्ली फिरले. घरबसल्या रोजगार मिळावा म्हणून बेलणे व पोलपाट पुरवून पापड तयार करण्याचे प्रशिक्षण दिले. या प्रयोगाला महिलांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला. आज त्यांनी लक्ष्मी-विष्णू चाळ, दमाणीनगर, गंगानगर, थोबडेवस्ती, देगाव नाका, कोयनानगर, सम्राट चौक, कुमठा नाका, विमानतळ अशा दहा ठिकाणी पापड संकलन केंद्रे चालविली आहेत.
कसा मिळतो रोजगार
पापड उद्योगात महिलांना घरबसल्या रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. डोंगरे हे जळगावहून उडीद डाळ खरेदी करतात. डाळ दळण्यासाठी पॉईजर, पीठ मळण्यासाठी अत्याधुनिक मशीन त्यांनी आणली आहे. कंपनीतर्फे त्यांना पापडाच्या मसल्याचे मिश्रण किती असावे याचा तक्ता दिला जातो. त्याप्रमाणे मळलेले पीठ महिलांना पुरविले जाते. एका किलोमध्ये १२५ ते १३५ पापड तयार होतात. ओल्या पीठातून पापड वाळल्यानंतर ८00 ग्रॅम वजन भरते. प्रति किलोस २0 रुपये मजुरी आहे. एक महिला दररोज सुमारे १0 किलोचे पापड तयार करते. घरातील काम संपल्यावर कुटुंबातील महिला या कामाला लागतात.
दुबई, अमेरिकेत मागणी
डोंगरे यांना मुंबईतील गणेश पापड कंपनीने काम दिले आहे. एक्स्पोर्ट क्वॉलिटीचे पापड यांच्याकडून कंपनी बनवून घेते. हे पापड दुबई, अमेरिका, आफ्रिका या ठिकाणी हे पापड मार्केटिंगला पाठवितात. उडीद पापडाला हॉटेलबरोबरच घरगुती मागणी मोठ्या प्रमाणावर असते. चवीनुसार पापडाचे प्रकार आहेत. त्यात लसून, मिरची, पंजाबी, सादा, टिकली, मिनी या पापडांना मागणी आहे. मसाला गुजरातहून मागविला जातो.
कोट....
कोणाचा आधार नसताना मी हे धाडस केले. गुजरातपेक्षा सोलापुरातील हवामान पापड उद्योगासाठी पोषक असल्याने मागणी जास्त आहे. आणखी अडीच हजार महिलांना रोजगार देण्याचा माझा प्रयत्न आहे.
राजेश डोंगरे