शहरं
Join us  
Trending Stories
1
आता डोनाल्ड ट्रम्प यांचं नवं नाटक...! भारताला, अफगाणिस्तान-पाकिस्तानसारख्या देशांशी जोडलं, चीनचंही नाव घेतलं!
2
ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन भास्कर मेहेंदळे यांचे निधन; ७८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
मीनाताई ठाकरेंच्या पुतळ्यावर लाल रंग टाकणारा अटकेत; कृत्याची कबुली, केले धक्कादायक खुलासे
4
“त्रिभाषा धोरण निश्चित करण्यासाठी जनमताचा कानोसा घेणार, ५ डिसेंबरला...”: डॉ.नरेंद्र जाधव
5
Asia Cup 2025 : दुबईत 'सिंग इज किंग' शो! PAK विरुद्ध UAE च्या ताफ्यातून सिमरनजीतचा भांगडा
6
"वेळ येणार, नद्या आणि धरणांसह संपूर्ण काश्मीर...", पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड सैफुल्लाह कसूरीची भारताला धमकी!
7
दिशा पाटनीच्या घरावर गोळीबार करणाऱ्या आरोपींचं एन्काउंटर, गाजियाबादमध्ये दोन्ही शूटर ठार; अशी पटवली ओळख
8
IND W vs AUS W 2nd ODI : स्मृतीच्या शतकी खेळीनंतर 'क्रांती'चा भेदक मारा! टीम इंडियाचा ऑस्ट्रेलियासमोर विक्रमी विजय
9
मीनाताई ठाकरे यांच्या पुतळ्याची विटंबना; CM देवेंद्र फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
10
Asia Cup 2025 : आधी टीम इंडियानं हँडशेक न केल्याची बोंब! आता UAE विरुद्धच्या मॅचआधी PAK चं नवं सोंग!
11
कुणबी प्रमाणपत्र कसे काढले जाते? १, २ नाही, १२ ते १६ कागदपत्रे आवश्यक; पाहा, पूर्ण प्रक्रिया
12
पंतप्रधान नरेंद्र मोदींना वाढदिवशी राहुल गांधींने पाठवले 'विशेष' पत्र; केली एक खास मागणी
13
"ह्या... हू... काय तुम्ही? कधी रे सुधारणार...? परत मी बोललो की...!" अजित दादांनी 'त्यांना' झाप-झाप झापलं
14
चलो दिल्ली! मनोज जरांगेंनी केली मोठी घोषणा; मराठा समाजाचे अधिवेशन घेणार, महत्त्वाचे कारण समोर
15
ह्युंदाईच्या या SUV ची किंमत ₹6 लाखही नव्हती, नव्या GST नंतर ₹86156 नं स्वस्त झाली; वरून ₹50000 चा डिस्काउंटही!
16
"क्लेमोर, वायर, पावडर... सगळं तयार होतं !" गुप्त माहितीने गडचिरोली पोलिसांनी रोखला भीषण कट
17
पाक आशिया कप स्पर्धेतून Out? सामान बसमध्ये अन् पाक खेळाडू हॉटेलमध्ये! नेमकं काय घडलं?
18
वाघाला घोरताना कधी पाहिलंय? VIDEO पाहून नेटकरी म्हणतायत, "हे तर आमच्या बाबांसारखेच..."
19
नवरात्रीचा मुहूर्त? पंतप्रधान मोदी नव्या ठिकाणाहून कामकाज पाहणार; PMOचा पत्ता बदलणार
20
प्रसिद्धीचा मुद्दा, अजितदादांचा फडणवीसांकडे रोख;  म्हणाले, “जाहिरात करावी तर देवाभाऊंसारखी”

आता कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडता येणार, सरकारने जारी केला ड्राफ्ट

By बाळकृष्ण परब | Updated: January 2, 2021 15:15 IST

work from home News : वर्क फ्रॉम होमबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याचा विचार करत आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडण्याची संधी मिळणार आहे.

ठळक मुद्देकामगार मंत्रालयाच्या वर्क फ्रॉम होम ड्राफ्टनुसार आयटी सेक्टरला अनेक सवलती मिळू शकतात.केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाने नव्या ड्राफ्टबाबत सर्वसामान्यांकडून अभिप्राय मागवले आहेतएप्रिलपासून कामगार मंत्रालय हा नवा कायदा लागू करू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे

नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे जगभरात निर्माण झालेल्या अभूतपूर्व परिस्थितीमुळे विविध क्षेत्रातील कार्यपद्धतीत आमुलाग्र बदल झाले आहे. कोरोनाकाळात जगातील इतर देशांप्रमाणेच भारतातही वर्क फ्रॉम होम बऱ्यापैकी प्रचलित झाले आहे. अनेक कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची परवानगी दिली आहे. दरम्यान, वर्क फ्रॉम होमबाबत केंद्र सरकार मोठा निर्णय घेण्याचा विचार करत आहे. त्यानुसार कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमचा पर्याय निवडण्याची संधी मिळणार आहे.इकॉनॉमिक टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार नव्या कायद्याच्या ड्राफ्टमध्ये खाणकाम, उत्पादन आणि सेवा क्षेत्रातील कर्मचाऱ्यांना समाविष्ट करण्यात येणार आहे. कामगार मंत्रालयाच्या वर्क फ्रॉम होम ड्राफ्टनुसार आयटी सेक्टरला अनेक सवलती मिळू शकतात. या ड्राफ्टमध्ये आयटी कर्मचाऱ्यांना कामाच्या तासांमध्ये सवलत मिळू शकते. कामगार मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार आयटी सेक्टरमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या संरक्षणासाठीसुद्धा ड्राफ्टमध्ये तरतूद करण्यात आली आहे. श्रममंत्रालयाच्या म्हणण्यानुसार सेवा क्षेत्रातील गरजांच्या हिशोबाने पहिल्यांदा वेगळे मॉडेल तयार करण्यात आले आहे.

नव्या ड्राफ्टमध्ये सर्व श्रमिकांसाठी रेल्वे प्रवासाच्या सुविधेचीही तरतूद करण्यात आली आहे. यापूर्वी ही सुविधा केवळ खाण क्षेत्रातील श्रमिकांनाच उपलब्ध होती. तर नव्या ड्राफ्टमध्ये नियम मोडल्यास शिक्षेची तरतूदही करण्यात आली आहे.दरम्यान, केंद्र सरकारच्या कामगार मंत्रालयाने नव्या ड्राफ्टबाबत सर्वसामान्यांकडून अभिप्राय मागवले आहेत. जर तुम्ही तुमच्याकडून या ड्राफ्टबाबत काही सल्ले देऊ इच्छित असाल तक ३० दिवसांच्या आत कामगार मंत्रालयाकडे पाठवू शकता. आता एप्रिलपासून कामगार मंत्रालय हा नवा कायदा लागू करू शकते, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.

टॅग्स :businessव्यवसायEmployeeकर्मचारीCentral Governmentकेंद्र सरकार