शहरं
Join us  
Trending Stories
1
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
2
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
3
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
4
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
5
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
6
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
7
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
8
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
9
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
10
Uber: उबर चालकांच्या उत्पन्नात वाढ; कंपनीकडून कमिशन कपात, भाडं वाढणार का?
11
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
12
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
13
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
14
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
15
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
16
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
17
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
18
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
19
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
20
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
Daily Top 2Weekly Top 5

एमिरेट्सचा यू-टर्न; विमानांमध्ये मिळणार हिंदू मील

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2018 08:49 IST

सोशल मीडियावरील टीकेनंतर एमिरेट्सकडून निर्णय रद्द

मुंबई: एमिरेट्सनं विमानांमधील हिंदू मील बंद करण्याचा निर्णय रद्द केला आहे. प्रवाशांकडून मिळणाऱ्या अभिप्रायांच्या पार्श्वभूमीवर हिंदू मील बंद करण्याचा निर्णय एमिरेट्सनं घेतला होता. तसं प्रसिद्धीपत्रकही कंपनीनं जारी केलं होतं. यावरुन एमिरेट्सला सोशल मीडियावर मोठ्या टीकेचा सामना करावा लागला. यानंतर एमिरेट्सनं यू-टर्न घेत विमानात हिंदू मीलचा पर्याय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला. दुबईच्या एमिरेट्स कंपनीनं विमानातील हिंदू मीलचा पर्याय हटवला होता. मात्र शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचे पर्याय सुरू ठेवले होते. या निर्णयावरुन कंपनीवर मोठी टीका झाली. सोशल मीडियानं या निर्णयाचा चांगलाच समाचार घेतला. त्यामुळे एमिरेट्सला हिंदू मील बंद करण्याचा निर्णय मागे घ्यावा लागला. परदेशात प्रवास करणारे बहुतांश प्रवासी एमिरेट्सला पसंती देतात. त्या पार्श्वभूमीवर एमिरेट्सनं यू-टर्न घेतल्याचं बोललं जात आहे. 'प्रवाशांच्या प्रतिक्रियांच्या आधारे आम्ही हिंदू मीलचा पर्याय सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे,' असं एमिरेट्सनं बुधवारी संध्याकाळी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं.प्रवाशांचे अभिप्राय आणि सूचना यांच्या आधारे हिंदू मील बंद करत असल्याचं एमिरेट्सनं मंगळवारी जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात म्हटलं होतं. 'एमिरेट्सनं हिंदू मीलचा पर्याय बंद केला आहे. आम्ही नेहमी विमानात दिल्या जाणाऱ्या सुविधांबद्दल प्रवाशांचे अभिप्राय घेत असतो. याच आधारावर आमच्याकडून सुविधांबद्दलचे निर्णय घेतले जातात,' असं कंपनीनं प्रसिद्धीपत्रकात नमूद केलं होतं. 'हिंदू प्रवासी शाकाहारी आऊटलेट्समधून त्यांचं जेवण बुक करु शकतात. या आऊटलेट्सकडून विमानातदेखील जेवण पुरवलं जातं. यामध्ये हिंदू मील, जैन मील, भारतीय शाकाहारी जेवण, बीफ नसलेलं मांसाहारी जेवण असे विविध पर्याय उपलब्ध असतात,' असंही एमिरेट्सनं प्रसिद्धीपत्रकात म्हटलं होतं.  

टॅग्स :Internationalआंतरराष्ट्रीयHinduहिंदू