शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
2
Train Accident: छत्तीसगडमध्ये मोठा रेल्वे अपघात, प्रवासी ट्रेन मालगाडीवर आदळली, ६ प्रवाशांचा मृत्यू, अनेक जण गंभीर जखमी
3
आता 'या' देशात पर्यटकही धूम्रपान करू शकणार नाहीत! सेलिब्रेटींमध्ये लोकप्रिय असणाऱ्या देशाचे नियम बदलले
4
भारताला डिवचण्याचा प्रयत्न; मोहम्मद युनूस यांनी पाकिस्ताननंतर तुर्कीला दिला वादग्रस्त नकाशा
5
Viral Video: लग्नात स्वयंपाक बनवताना तरुणाचं घाणेरडं कृत्य; व्हिडिओ समोर येताच अटक!
6
३०, ४० आणि ५० व्या वर्षी 'कोट्यधीश' व्हायचेय? तुमच्या वयानुसार निवडा गुंतवणुकीची योग्य स्ट्रॅटेजी!
7
Maharashtra Local Body Elections: २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतीसाठी निवडणूक जाहीर; 'असा' आहे कार्यक्रम, 'दुबार मतदार'ही समजणार
8
ICC Rankings : हातात विश्वचषकाचा 'दागिना'; पण जाता जाता लॉरानं 'वनडे क्वीन’ स्मृतीचा मुकूट हिसकावला!
9
दुबार मतदारांच्या नावासमोर 'डबल स्टार' येणार; राज्य निवडणूक आयोगाचं मोठं पाऊल, कशी असेल नवी मोहीम?
10
सलग चौथ्या दिवशी बाजारात घसरण! गुंतवणूकदारांचे २.६ लाख कोटी पाण्यात; 'ही' आहेत ५ कारणे
11
लग्नात का येताहेत समस्या? कोणत्या सुधारणा आवश्यक? न्यायालयानं स्पष्टच सांगितलं
12
मंदिराच्या गर्भगृहाची दुरुस्ती करताना सापडलं घबाड, कलशात होती सोन्याची एवढी नाणी...  
13
माणुसकीचा जमानाच राहीला नाही! ओला रायडरची मदत केली अन् तो तरुणीसोबत 'असा' वागला
14
अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचा शिंदेंना धक्का, रायगडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेशी आघाडी
15
महादेव बेटिंग अ‍ॅप प्रकरणातील मुख्य आरोपी दुबईतून बेपत्ता, भारताच्या प्रत्यार्पणाच्या आशेला धक्का
16
'या' योजनेत गुंतवणूक केल्यास मिळेल दुहेरी फायदा आणि तगडा परतावा, निवृत्तीनंतरचे टेन्शन होईल 'गायब'!
17
सप्तपदीनंतर दोन तासांत लग्न मोडलं, वधू पक्षाने वराला झोड झोड झोडलं, नेमकं काय घडलं?  
18
कॅनडाने भारतीय विद्यार्थ्यांना दिला मोठा धक्का, ७४% विद्यार्थी व्हिसा अर्ज नाकारले
19
उद्योग जगताला मोठा धक्का! हिंदुजा ग्रुपचे अध्यक्ष गोपीचंद पी. हिंदुजा यांचे लंडनमध्ये निधन
20
चॅटजीपीटी आता तुम्हाला 'या' मुद्द्यांवर सल्ला देणार नाही! कंपनीने का बदलले नियम?

मस्क है तो मुमकीन है! भारतात सॅटेलाईट बेस्ड इंटरनेट सेवा देण्याची तयारी; इंटरनेट तुफान वेगानं चालणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 12, 2021 07:17 IST

मस्क यांनी टेस्लाचा प्लाण्ट बंगळुरूत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता ते भारतात मोबाइल इंटरनेट सेवा क्षेत्रातही पाय रोवू इच्छितात.

नवी दिल्ली : जगप्रसिद्ध अशा टेस्ला या इलेक्ट्रिक कार कंपनीचे सर्वेसर्वा, जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती वगैरे बिरुदावली मिरवणारे एलॉन मस्क हे एक बडे प्रस्थ आहेत. मस्क यांनी टेस्लाचा प्लाण्ट बंगळुरूत सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता ते भारतात मोबाइल इंटरनेट सेवा क्षेत्रातही पाय रोवू इच्छितात. त्यासंदर्भात अलीकडेच मस्क यांनी केंद्र सरकारकडे एक प्रस्ताव सादर केला आहे. सॅटेलाइट बेस्ट इंटरनेट सेवा देण्याची त्यांची योजना आहे. जाणून घेऊ याबाबत...१२१ एमबीपीएस वेगाच्या साह्याने दक्षिण कोरिया क्रमांक एकवर८१% भारतीय ४जी वेगाचा मोबाइल वापतात. मस्क स्टारलिंक प्रोजेक्ट अंतर्गत भारतात सॅटेलाइट बेस्ड इंटरनेट सेवा पुरवणार१००  एमबीपीएस (मेगाबाइट प्रति सेकंद) एवढा इंटरनेट स्पीड असेल, असा मस्क याचा दावाहे भारतात शक्य आहे का?पृथ्वीच्या कक्षेत भूस्थिर राहणारे उपग्रह स्पेस एक्सद्वारे अवकाशात सोडले जातात. त्याद्वारे ब्रॉडबॅण्ड इंटरनेट सेवा पुरविल्या जातात. जगातल्या अगदी दुर्गम भागातही उपग्रहाद्वारे इंटरनेट सेवा पुरविणे या प्रोजेक्टमुळे स्पेस एक्सला शक्य होते. आतापर्यंत १००० उपग्रह स्पेस एक्सने या उद्देशाने अवकाशात भूस्थिर केले आहेत. ५० ते १५० एमबीपीएस वेगाचे इंटरनेट देणे स्पेस एक्सला देणे शक्य झाले आहे. आता स्पेस एक्सला स्टारलिंक प्रोजेक्टची व्याप्ती वाढवायची असून त्यासाठी भारतात ते प्रयत्न करत आहेत.सध्या स्पीड काय१२.०७ एमबीपीएस भारतातील मोबाइल डाउनलोडिंगचा वेग३५.२६ एमबीपीएस जगाचा डाउनलोडिंगचा सरासरी वेगमोबाइल इंटरनेट सेवा पुरवणाऱ्या बड्या कंपन्या आणि त्यांचा बाजार हिस्सारिलायन्स जिओ ३४.७६% (सरासरी वेग : १९.३ एमबीपीएस)भारती एअरटेल  २८.३३% (सरासरी वेग : १०.२ एमबीपीएस)व्होडाफोन-आयडिया  २८.३३% (सरासरी वेग : १०.३ एमबीपीएस)बीएसएनएल १०.८४% (सरासरी वेग : १०.५ एमबीपीएस)सॅटेलाइट इंटरनेटचा फायदा काय?जमिनीखाली ऑप्टिकल फायबरचे जाळे उभारण्याचे टळेल.तांत्रिक अडचणी न येता नेटसेवा मिळेल.ग्रामीण भागातील युझर्सना अधिक सोयिस्कर ठरेल. तूर्तास त्यांना कंपन्यांच्या नेटवर्कच्या अडचणींचा सामना करावा लागतो.इंटरनेटचा वापर वाढून त्याचा अंतिम फायदा ग्राहकांनाच होईल.इतर कंपन्यांना मोठ्या स्पर्धेला तोंड द्यावे लागेल.

टॅग्स :Teslaटेस्ला