शहरं
Join us  
Trending Stories
1
"ऑपरेशन सिंदूर हे लहान मुलांच्या व्हिडीओ गेमसारखे" नाना पटोलेंचं वक्तव्य
2
धरणं सुकली, शेतकरी त्रासले; सिंधु पाणी करार स्थगित झाल्याने पाकिस्तानमध्ये हाहाकार! सध्या परिस्थिती काय?
3
आधीच कर्जबाजारी त्यात आणखी भर! पाकिस्तान चीनकडून ४० विमाने खरेदी करणार; बजेटमधून मोठा खुलासा
4
राज-फडणवीस भेटले, विरोधकांचे टेन्शन वाढवले? महापालिका निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या भेटीसंदर्भात नाना पटोले काय बोलले?
5
'काँग्रेस का हात, पाकिस्तान के साथ' हे पुन्हा एकदा सिद्ध झालं; भाजपाचा नाना पटोलेंवर पलटवार
6
मोठी 'राज'कीय घडामोड! देवेंद्र फडणवीस - राज ठाकरे यांची ताज हॉटेलमध्ये बैठक? चर्चांना उधाण
7
देवेंद्र फडणवीस-राज ठाकरे भेटीनंतरही उद्धवसेनेचे नेते मनसेसोबत युतीवर सकारात्मक, म्हणाले... 
8
दोन मुलांची आई १७ वर्षांच्या तरुणाच्या प्रेमात पडली, वर्ष झालं पिच्छा सोडेना, अखेर तरुणाने 'असा' शिकवला धडा! 
9
खळबळजनक! ४ लाख फॉलोअर्स असलेल्या महिला इन्फ्लुएन्सरचा कारमध्ये सापडला मृतदेह
10
WTC Final : शमीला मागे टाकत स्टार्कनं सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड; त्यात टीम इंडियाचा मोठा हातभार
11
"पाकिस्तान्यांचा नानांना भलताच कळवळा?, तुमचा आणि तुमच्या मालकाचा डीएनए एकच...देशद्रोह"
12
Astro Tips: शुक्र केतू युती सुखाने जगू देत नाही; आयुष्यात होते मोठे नुकसान!
13
पाकिस्तानचा हा कट्टर शत्रू तयार करतोय आत्मघातकी ड्रोनची फौज; इस्लामाबाद असो वा कराची, क्षणात होईल माती-माती!
14
'आता आणखी खेळाडू निवृत्त होतील...'; वर्ल्डकप विजेत्या कर्णधाराने केला धक्कादायक दावा
15
"लिव्ह इनमध्ये राहण्याचा खूप फायदा", मराठी अभिनेत्रीने मांडले विचार; म्हणाली, "आपले खरे रंग..."
16
आरोग्य विमा घेताना फसगत नको! 'हे' ६ प्रश्न विचाराच, अन्यथा पैसे वाया जातील!
17
लग्नाच्या ३ वर्षांनंतर आलिया भटने नावात केला मोठा बदल; हॉटेलमधील 'त्या' फोटोमुळे चर्चांना उधाण
18
डिसेंबरपासून बंद पडलंय 'या' शेअरचं ट्रेडिंग; किंमत फक्त १० रुपये, आता समोर आली मोठी अपडेट 
19
IND vs ENG : टीम इंडियातील या स्टार खेळाडूसाठी गांगुलीनं घेतला BCCI निवडकर्त्यांशी पंगा! म्हणाला...

पात्र गटातील मुलांचे लवकरात लवकर होणार लसीकरण - पंतप्रधान नरेंद्र मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 28, 2022 07:03 IST

देशातील कोरोना स्थितीचा पंतप्रधानांनी बुधवारी एका बैठकीत आढावा घेतला व त्यावेळी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला.

नवी दिल्ली : कोरोना साथ अजून संपलेली नाही. गेल्या दोन आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा वाढत आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी प्रतिबंधक उपायांचे यापुढेही पालन करीत राहावे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. पात्र गटातील मुलांना प्राधान्याने व लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधक लस देण्यात येईल, असेही ते म्हणाले.

देशातील कोरोना स्थितीचा पंतप्रधानांनी बुधवारी एका बैठकीत आढावा घेतला व त्यावेळी सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे संवाद साधला. ते म्हणाले की, पात्र गटातील सर्व मुलांनी कोरोना लस घ्यावी यासाठी शाळातून जागृती मोहीम हाती घ्यायला हवी. या संवादाप्रसंगी केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी जगातील कोणत्या देशामध्ये तसेच भारतातील कोणत्या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे, याची सविस्तर माहिती सर्व मुख्यमंत्र्यांना दिली. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, कोरोना साथीशी मुकाबला करण्यात सर्व राज्यांनी उत्तम सहकार्य केले आहे. त्यासाठी मोदी यांनी विविध राज्यांचे मुख्यमंत्री, सरकारी अधिकारी, कोरोना योद्धा यांचे अभिनंदन केले. कोरोना साथीचे आव्हान अजून संपुष्टात आलेले नाही. ओमायक्रॉन व त्या विषाणूचे उपप्रकार खूप अडचणी निर्माण करू शकतात, हे युरोपमधील देशांमध्ये दिसून आले आहे. त्यामुळे अनेक देशात कोरोनाच्या संसर्गाने पुन्हा डोके वर काढले आहे.  भारतातही काही राज्यांमध्येही ही स्थिती निर्माण झाली असून, त्यामुळे सावध राहण्याची गरज आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले. 

लस ही मोठी संरक्षक ढालपंतप्रधान मोदी म्हणाले की, ओमायक्रॉनच्या लाटेचा देशाने नीट मुकाबला केला. ९६ देशातील लोकांना प्रौढांपैकी लसीचा किमान एक डोस दिला आहे. १५ वर्षे वयावरील ८४ टक्के लोकांना लसीचे दोन्ही डोस देण्यात आले आहेत. कोरोनापासून वाचण्यासाठी लस ही मोठी संरक्षक ढाल आहे. 

 

टॅग्स :Corona vaccineकोरोनाची लसNarendra Modiनरेंद्र मोदी