शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

Video - बापरे! वीज बिल भरलं नाही म्हणून टीव्ही, फ्रीज, कूलर केलं जप्त, घरंही केलं सील

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 15:00 IST

वीज कंपनीने ग्राहकांकडून बिल वसुलीसाठी अवलंबलेल्या अजब पद्धतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.

ग्राहक वेळेवर वीज बिल भरत नाही, तेव्हा त्यांना दंड आकारला जातो किंवा त्यांचे वीज कनेक्शन तोडले जाते. पण मध्य प्रदेशमध्ये वीज बिलाच्या वसुलीचा अजब प्रकार समोर आला आहे. बिल भरत नसलेल्यांच्या विरोधात कडक कारवाई करण्यात येत आहे. अशा लोकांविरोधात अभियान चालवण्यात येत आहे. एका वीज कंपनीने लोकांच्या घरातून थेट टीव्ही, फ्रीज, कूलर, हीटरसारख्या वस्तू जप्त केल्या आहेत. 

मध्य प्रदेशमधील वीज कंपनीने ग्राहकांकडून बिल वसुलीसाठी अवलंबलेल्या अजब पद्धतीची सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे. मध्य प्रदेशातील उज्जैन ही घटना घडली आहे. जिथे एका वीज कंपनीने बिल गोळा करण्यासाठी लोकांच्या घरातील सामान उचलण्यास सुरुवात केली. रविवारी सात जणांच्या घरांमधून फ्रीज, टीव्ही, कुलर, हीटर आणि इतर वस्तू जप्त केल्याचा दावा करण्यात आला होता. 

जप्त केलेल्या सामानातून मिळालेल्या रकमेतून बिलाची भरपाई केली जाईल. वीज कंपनीशी संबंधित राजेश हारोड यांनी दिलेल्या माहितीनुसार, लोक विजेचा वापर करत आहेत. पण बिलं भरताना त्याकडे दुर्लक्ष करतात, बिल भरत नाहीत. काही लोकांवर तर तब्बल 90 हजार रुपयांपेक्षा जास्त बिल आहे. लोकांनी बिल न भरल्याने कंपनीने लोकांच्या घरातील वस्तू जप्त करण्यास सुरुवात केली आहे.

ज्या घरांतून माल जप्त करण्यात आला आहे, तिथे दोन-तीन वर्षांपासून वीज बिल जमा झालेले नाही. सुमारे 200 लोकांकडे वीज कंपनीचे 1.70 कोटी रुपयांचे कर्ज आहे. या लोकांना जप्तीच्या नोटिसा बजावण्यात आल्या होत्या, त्यापैकी 70 जणांनी वीज बिल जमा केलं आहे. उरलेल्यांनी गांभीर्याने न घेतल्यामुळे असं कठोर पाऊल उचलण्यात आलं. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेश