शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

Rajya Sabha Election: राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जूनला होणार निवडणूक; महाराष्ट्रात काेणाला मिळणार संधी?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 13, 2022 06:59 IST

भाजपला आंध्र प्रदेश, झारखंड आणि राजस्थानमध्ये हादरा बसू शकतो. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधून याची भरपाई होण्याची भाजपला आशा आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नवी दिल्ली : पंधरा राज्यांतील राज्यसभेच्या ५७ जागांसाठी १० जून रोजी निवडणूक घेण्याची घोषणा निवडणूक आयोगाने गुरुवारी केली. अकाली दलाचे राज्यसभेतील प्रतिनिधित्व संपुष्टात येण्याची आणि अलीकडेच शंभर सदस्यांचा आकडा गाठणाऱ्या भाजपचे संख्याबळही कमी होण्याची शक्यता आहे. जून आणि ऑगस्ट महिन्यांत वेगवेगळ्या तारखेला सदस्य निवृत्त होत असल्याने या रिक्त जागांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे. अधिसूचना २४ मे रोजी जारी करण्यात येणार असून, १० जून रोजी मतदान घेतले जाईल.

निवृत्त होणाऱ्या प्रमुख सदस्यांत केंद्रीय मंत्री पीयूष गोयल आणि मुख्तार अब्बास नक्वी, अंबिका सोनी, जयराम रमेश, कपिल सिब्बल (काँग्रेस) आणि बसपचे सतीश चंद्र मिश्रा यांचा समावेश आहे. २१ जून आणि १ ऑगस्टदरम्यान हे सदस्य निवृत्त होणार आहेत. २४५ सदस्य असलेल्या राज्यसभेत भाजपचे सध्या ९५ सदस्य असून, काँग्रेसचे २९ आहेत. 

उत्तर प्रदेशचे ११, महाराष्ट्र आणि तमिळनाडूचे प्रत्येकी ६ आणि आंध्र प्रदेश, राजस्थान आणि कर्नाटकचे प्रत्येकी ४ सदस्य निवृत्त होत आहेत. मध्य प्रदेश आणि ओडिशाचे प्रत्येकी ३ तसेच तेलंगणा, छत्तीसगढ, पंजाब, झारखंड आणि हरयाणाचे प्रत्येकी २ आणि उत्तराखंडचे एक सदस्यही निवृत्त होत आहेत.

भाजपला आंध्र प्रदेश, झारखंड आणि राजस्थानमध्ये हादरा बसू शकतो. उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमधून याची भरपाई होण्याची भाजपला आशा आहे. आंध्र प्रदेशातील भाजपच्या तीन सदस्यांचीही मुदत संपत आहे. पंजाबचे अकाली दलाचे एकमेव सदस्य बलविंदर सिंग, काँग्रेसच्या अंबिका सोनी यांच्या रिक्त होणारी जागा आम आदमी पार्टीचे सदस्य घेऊ शकतात. कारण पंजाब विधानसभेतील प्रचंड संख्याबळ पाहता आम आदमी पार्टी या दोन्ही जागा जिंकू शकते.    

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभा