शहरं
Join us  
Trending Stories
1
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
2
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
3
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
4
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
5
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
6
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
7
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
8
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
9
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
10
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
11
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
12
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
13
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
14
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
15
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
16
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
17
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
18
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
19
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
20
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
Daily Top 2Weekly Top 5

रमजान महिन्यात निवडणुका टाळता येणार नाहीत : निवडणूक आयोग

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2019 06:31 IST

ओवैसी यांनीही दिला पाठिंबा

नवी दिल्ली : रमजान महिन्यात येणाऱ्या मतदानाच्या तारखांवरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. काही मुस्लिम धर्मगुरुंनी त्यावर आक्षेप घेतला असला तरी निवडणुका टाळता येणार नाहीत, असे स्पष्टीकरण निवडणूक आयोगाने दिले आहे. एमआयएमचे नेते असदुद्दिन ओवैसी यांनी तारखांचे समर्थन करून, याचे राजकारण नको, असे म्हटले आहे.दोन जूनपासून नवीन सरकारची स्थापना होण्याची गरज आहे. एका महिन्यात निडणुका होतील, असे शक्य नव्हते. संपूर्ण महिना वगळून निवडणूक पुढे ढकलता येणार नाही, त्यामुळे रमजानचा विचार करूनच तारखा ठरवण्यात आल्याचे आयोगाने म्हटले आहे. त्यामुळे या महिन्यातील सर्व शुक्रवार आणि मुख्य सणाचा दिवस वगळूनच मतदानाच्या तारखा ठरवण्यात आल्या आहेत, असे निवडणूक आयोगाने म्हटले आहे. ओवैसी म्हणाले की, रमजानच्या काळात आपण इतरही कामे करतोच. तसे मुस्लीम रोजा करून मतदानाला जाऊ शकतो. उलट या काळात मुस्लीम समाज मोठ्या प्रमाणात मतदान करेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.६ मे पासून रमजानचा महिना सुरु होणार आहे. या महिन्यात निवडणुका घेऊ नये, रमजाननंतर निवडणुका घेण्यात याव्यात अशी मागणी देवबंदी उलेमा या मुस्लिम संघटनेने केली आहे. मदरसा जामिया शैखुल हिंदचे आलीम मुफ्ती असद कसमी यांनी निवडणुकींच्या तारखांवर आक्षेप घेतला आहे. मुस्लिम धर्मगुरु खालिद रशीद फरंगी यांनीही तारखांवर आक्षेत घेतला. त्यांनी लोकसभा निवडणुकीचे मतदान रमजाननंतर घेण्यात यावे अशी मागणीही केली आहे. तृणमूल काँग्रेसचे नेते फिरहाद हकीम यांनीही तारखांबाबत आयोगाने पुर्नविचार करावा, अशी मागणी केली आहे.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९