शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 5, 2025 06:25 IST

नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसारच होतील आणि महानगरपालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत २७ टक्के ओबीसी आरक्षण लागू राहील, असे न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले.

नवी दिल्ली : महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील ओबीसी आरक्षण आणि प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी फेटाळून लावल्या. त्यामुळे गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या या निवडणुकांचा मार्ग आता पूर्णपणे मोकळा झाला आहे. नगरपालिका, महानगरपालिकांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसारच होतील आणि महानगरपालिकांसह सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत २७ टक्के ओबीसी आरक्षण लागू राहील, असे न्यायालयाने सोमवारी स्पष्ट केले.सर्वोच्च न्यायालयाच्या न्या. सूर्य कांत आणि न्या. एन. कोटीश्वर सिंह यांच्या खंडपीठाने ६ मे रोजी दिलेल्या निर्देशानुसारच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, असे स्पष्ट करताना ओबीसी आरक्षण आणि नवीन प्रभाग रचनेला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावल्या. ओबीसींचे आरक्षण बांठिया आयोगाच्या अगोदर जसे होते तसेच लागू राहील, असे न्यायालयाने ६ मे २०२५ रोजीच्या निकालात म्हटले होते.

आता सगळ्याच जिल्ह्यात पूर्णपणे ओबीसी आरक्षण राहणार आहे. ओबीसी आरक्षणासह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होतील, याचा आनंद आहे. २०२२ प्रमाणे नाही तर २०१७ प्रमाणेच निवडणुका होतील, या राज्य सरकारच्या दोन्ही बाबी न्यायालयाने मान्य केल्या आहेत.

देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्रीसर्वोच्च न्यायालयाचा हा निकाल सर्व मागासवर्गीय बांधव-भगिनींसाठी मोठा दिलासा आहे. सर्वोच्च न्यायालयाने आम्हाला आमचा न्याय परत मिळवून दिला. दोन-चार वर्षांत ओबीसी आरक्षणाबाबत अडथळे निर्माण झाले होते. ते सर्वोच्च न्यायालयाने आता पूर्णपणे दूर केले आहेत.छगन भुजबळ, मंत्री व ओबीसी नेते

‘तो’ पूर्णपणे राज्याचा अधिकारनिवडणुकांत वॉर्ड आणि प्रभाग रचना कायम ठेवायची की नवीन रचना करायची, हा संपूर्ण अधिकार राज्य सरकार आणि राज्य निवडणूक आयोगाचा आहे. न्यायालय त्यात हस्तक्षेप करणार नाही. राज्य विधिमंडळाने कायदा केला आहे आणि या कायद्याला स्थगिती नसल्यामुळे हा पूर्णपणे राज्याचा अधिकार आहे, असे न्यायालयाने म्हटले.

प्रभाग रचनेचा वाद संपुष्टातस्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीतील सर्वात मोठा वाद प्रभाग रचनेवरून होता. महायुती सरकारने केलेल्या बदलांनंतर महाविकास आघाडी सरकारने त्यात फेरबदल केले. त्यानंतर एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वाखालील सरकारने पुन्हा प्रभाग रचनेत बदल केले होते. या सर्व राजकीय उलथापालथीमुळे निवडणुका पुढे ढकलल्या जात होत्या. कोर्टाच्या निकालामुळे या विषयावरील संघर्ष संपुष्टात आला आहे.

पहिल्याच सुनावणीत निकाल : स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत ओबीसींना २७ टक्के आरक्षण देऊ नये व लातूर जिल्ह्यातील औसा नगरपालिकेची निवडणूक ११ मार्च २०२२ रोजीच्या प्रभाग रचनेनुसार घेण्यात यावी, अशी मागणी करणाऱ्या दोन याचिका न्यायालयात दाखल झाल्या होत्या. दोन्ही याचिका पहिल्याच सुनावणीत कोर्टाने फेटाळून लावल्या.

टॅग्स :Electionनिवडणूक 2024OBC Reservationओबीसी आरक्षणSupreme Courtसर्वोच्च न्यायालय