शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभेच्या ६४ जागांसाठी पोटनिवडणुका

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 22, 2019 02:13 IST

नवी दिल्ली : १८ राज्यांतील ६४ विधानसभा मतदारसंघ, तसेच एका लोकसभा मतदारसंघात २१ आॅक्टोबर रोजी पोटनिवडणुका घेण्यात येणार असल्याची ...

नवी दिल्ली : १८ राज्यांतील ६४ विधानसभा मतदारसंघ, तसेच एका लोकसभा मतदारसंघात २१ आॅक्टोबर रोजी पोटनिवडणुका घेण्यात येणार असल्याची घोषणा निवडणूक आयोगाने केली आहे. २४ आॅक्टोबर रोजी निकाल जाहीर होणार आहे.मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी सांगितले की, कर्नाटकातील १५ आणि उत्तर प्रदेशातील ११ विधानसभा मतदारसंघांचा त्यात समावेश आहे. कर्नाटकात अलीकडेच अपात्र ठरविण्यात आलेल्या आमदारांच्या मतदारसंघांतही पोटनिवडणुका होत आहेत. उत्तर प्रदेशातील बहुतांश मतदारसंघांतील आमदार लोकसभेवर निवडून गेल्याने तेथे पोटनिवडणुका होत आहेत.बिहारमधील समस्तीपूर लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक होणार आहे. येथील लोकजनशक्तीचे खासदार रामचंद्र पासवान यांचा जुलैमध्ये मृत्यू झाल्याने ही जागा रिक्त झाली आहे. सातारा लोकसभा मतदारसंघात मात्र २१ आॅक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीसोबत मतदान होणार नाही, असे अरोरा यांनी सांगितले. येथील खासदार उदयन राजे भोसले यांनी राष्ट्रवादी सोडून भाजपमध्ये प्रवेश केल्याने राजीनामा दिला आहे.पश्चिम बंगालमधील विधानसभेच्या पोटनिवडणुकाही टाळण्यात आल्या आहेत. दुर्गापूजा उत्सवामुळे त्या पुढे ढकलण्याची विनंती राज्य सरकारने केली होती. त्यानुसार, हा निर्णय घेण्यात आल्याचे अरोरा यांनी सांगितले. पंचायत निवडणुका असल्यामुळे छत्तीसगढमधील पोटनिवडणुकाही टाळण्यात आल्या आहेत. उच्च न्यायालयात वाद प्रलंबित असल्यामुळे इतर काही ठिकाणी पोटनिवडणुका टाळण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.विधानसभेच्या पोटनिवडणुका होत असलेल्या राज्यांत अरुणाचल प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगणा, मध्यप्रदेश, मेघालय, ओडिशा आणि पुदुचेरी (प्रत्येकी एक जागा) तसेच आसाम (४), बिहार (५), गुजरात (४), हिमाचल प्रदेश (२), केरळ (५), पंजाब (४), राजस्थान (२), तामिळनाडू (२) आणि सिक्कीम (३) यांचा समावेश आहे.

टॅग्स :Electionनिवडणूक