शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईतील उत्तर भारतीयांना OBC आरक्षण मिळणार?: शिंदेसेनेचे नेते संजय निरुपम यांनी दिले संकेत
2
"हिंदू वेळीच एकवटला नाही तर भारतात गल्लोगल्ली बांगलादेशसारखा..."; धीरेंद्र शास्त्रींचा इशारा
3
धक्कातंत्र! कार्यालयाबाहेर निष्ठावंतांची घोषणाबाजी; आतमध्ये ५ बड्या नेत्यांचा भाजपात प्रवेश
4
ना पोस्ट, ना लाइक, ना कमेंट...; आता जवानांना केवळ इंस्टाग्राम बघण्याचीच परवानगी
5
गुंतवणूकदारांनो लक्ष द्या! नवीन वर्षात शेअर बाजाराला १५ दिवस सुट्टी; एनएसईकडून कॅलेंडर प्रसिद्ध
6
नाताळाला गालबोट; महाराष्ट्र, केरळसह काही राज्यांत तोडफोड अन् झटापटीच्या घटना...
7
“मी खरा वाघ आहे, त्यांच्यासारखा कागदी नाही”; रावसाहेब दानवेंचे ठाकरे बंधूंना प्रत्युत्तर
8
टीव्ही अभिनेत्याला झालेली खुलेआम मारहाण; म्हणाला, "तो अजूनही मोकाट...", मुंबई आता असुरक्षित?
9
कर्क राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? स्वप्नपूर्ती आणि मानसन्मानाचे वर्ष; पण आरोग्याबाबत राहा सतर्क!
10
शेख हसीना यांना परत बांग्लादेशात न पाठवून भारताने..; शशी थरुर यांचे मोठे वक्तव्य
11
गृहकर्ज घेण्याचा विचार करताय? कोणती बँक देतेय सर्वात स्वस्त होम लोन? पाहा संपूर्ण यादी
12
वैभव सूर्यवंशी पहिल्या सामन्यात बनला 'नंबर १'; रोहित शर्मा, विराट कोहलीला टाकलं मागे
13
एसबीआयमध्ये मॅनेजर असल्याचं सांगून तरुणीला जाळ्यात ओढलं; भेटायला बोलावलं अन् लुटून झाला पसार!
14
Pune Crime: शेजारी राहणाऱ्या तरुणीसोबत प्रेमसंबंध, तिच्यासह नांदेडमधून पळाला; पण पुण्यात झाली हत्या
15
ठाकरे बंधू एकत्र आल्याचा जल्लोष केला अन् दुसऱ्याच दिवशी नाशिकमधील मनसे नेत्याचा राजीनामा
16
मिथुन राशीसाठी नवीन वर्ष 2026 कसं असेल? आधी संघर्ष, नंतर मोठे यश; 'जबाबदारी' ठरेल प्रगतीचा मूलमंत्र!
17
“भाजपाने मराठी माणसासाठी काय केले? ठाकरे आहेत म्हणून तुम्ही राज्याचे CM आहात”: संजय राऊत
18
“याद राखा, मराठीचा अपमान केला तर ‘नहीं बटोगे... तो भी पिटोगे’”; मनसेने दिला थेट इशारा
19
हीच ती वेळ! शशी थरुर म्हणाले; सचिनसारखी प्रतिभा असलेल्या वैभव सूर्यवंशीला टीम इंडियात संधी द्या
Daily Top 2Weekly Top 5

UP Election : ... तर उत्तर प्रदेश सोडून निघून जाईन, मुनव्वर राणांचा थेट औवेसींवर निशाणा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 17, 2021 19:07 IST

UP Election : उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षात विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून चांगलीच मोर्चेबांधणी सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही येथे खास लक्ष आहे. त्यात, एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन औवेसी यांनी येथे भाजपला चॅलेंज केंल आहे.

ठळक मुद्देभाजपा आणि एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे असे दोन कुस्पीपटू आहेत जे केवळ लोकांना दाखवण्यासाठी एकमेकांविरोधात लढत आहेत.

लखनौ - एमआयआयचे प्रमुख असदुद्दीन औवेसी यांच्यावर नेहमीच भाजपाची बी टीम असल्याचा आरोप होतो. पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकांवेळीही त्यांच्यावर भाजपाच्या सोयीनं राजकारण करणारा पक्ष असल्याची टीका तृणमूल काँग्रेसकडून करण्यात आली होती. आता, प्रसिद्ध उर्दू शायर आणि उत्तर प्रदेशचे नामवंत व्यक्ती असलेल्या मुन्नवर राणा यांनीही असदुद्दीन औवेसी यांना अनुसरुन मोठी घोषणाच केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर त्यांनी ही घोषणा केली. 

उत्तर प्रदेशमध्ये पुढील वर्षात विधानसभा निवडणुका पार पडत आहेत. त्या पार्श्वभूमीवर भाजपाकडून चांगलीच मोर्चेबांधणी सुरू असून पंतप्रधान नरेंद्र मोदींचंही येथे खास लक्ष आहे. त्यात, एमआयएमचे प्रमुख असुदुद्दीन औवेसी यांनी येथे भाजपला चॅलेंज केंल आहे. त्यानंतर, भाजपला 300 पेक्षा अधिक जागांवर विजय मिळेल, असा विश्वास योगी आदित्यनाथ यांनी व्यक्त केला आहे. आता, या वादात प्रसिद्ध शायर मुनव्वर राणा यांनी उडी घेतली आहे. 

भाजपा आणि एमआयएम पक्षाचे अध्यक्ष असदुद्दीन ओवैसी हे असे दोन कुस्पीपटू आहेत जे केवळ लोकांना दाखवण्यासाठी एकमेकांविरोधात लढत आहेत. मतांचं ध्रुवीकरण व्हावं आणि त्याचा फायदा भाजपाला व्हावा असा या दोघांचा डाव असल्याचं, मुनव्वर राणा यांनी म्हटलं आहे. तसेच, ओवैसींमुळे योगी आदित्यनाथ पुन्हा राज्याचे मुख्यमंत्री झाले तर मी राज्य सोडून निघून जाईन, असं मुनव्वर राणा म्हणाले आहेत. 

औवेसींचा योगी सरकारवर निशाणा

ओवैसी यांनी उत्तर प्रदेशमध्ये लागू करण्यात आलेल्या  उत्तर प्रदेश लोकसंख्या धोरण २०२१-२०३० वरुन टीका केली होती. “डिसेंबर २०२०मध्ये केंद्रातील मोदी सरकारने न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटलं होतं की जन्मदर (Total Fertility Rate) घटू लागल्यामुळे देशात दोन अपत्य धोरण राबवता येणार नाही. पण, दुसरीकडे योगी सरकार मात्र त्यालाच विरोध करत आहे. हा प्रस्ताव मांडून योगी सरकार मोदी सरकारच्या विरोधात जाणार का?”, असा प्रश्न ओवैसींनी उपस्थित केला होता.  

१०० जागांवर एमआयएम निवडणूक लढणार

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी हे मोठे नेते असल्याचं वक्तव्य करत त्यांनी दिलेलं आव्हान स्वीकारलं आहे. कोणत्याही परिस्थितीत २०२२ मध्ये पार पडणाऱ्या निवडणुकांमध्ये योगी आदित्यनाथ यांना मुख्यमंत्री बनू देणार नाही, असं वक्तव्य ओवेसी यांनी केलं होतं. तसेच, एमआयएम हा पक्ष उत्तर प्रदेशात १०० जागादेखील लढवणार आहे.

टॅग्स :Asaduddin Owaisiअसदुद्दीन ओवेसीyogi adityanathयोगी आदित्यनाथ