शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
3
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
4
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
5
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
6
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
7
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
8
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
9
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
10
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
11
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
12
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
13
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
14
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
15
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
16
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
17
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
18
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
19
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
Daily Top 2Weekly Top 5

पाच राज्यांच्या निवडणूक निकालांचा संसद अधिवेशनावर होणार परिणाम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 14:40 IST

भारतीय दंड संहिता विधेयक होणार पारित

संजय शर्मानवी दिल्ली : पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांच्या निकालांचा चार डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनावर स्पष्ट परिणाम दिसणार आहे. महुआ मोईत्रा, नरेंद्र सिंह तोमर यांच्या मुलाचा व्हिडीओ आदी मुद्यांवर विरोधी पक्ष आक्रमक होतील, अशी शक्यता आहे.पाचपैकी तीन राज्यांत भाजप व काँग्रेसमध्ये थेट लढत आहे. केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्र सिंह तोमर यांचा मुलगा देवेंद्र तोमर याचा एक व्हिडीओ व्हायरल झाल्यामुळे विरोधी पक्ष केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी करू शकतात. 

nतृणमूल काँग्रेसच्या खा. महुआ मोईत्रा यांच्यावर संसदेच्या नैतिकता समितीने कारवाई करण्याची शिफारस केली आहे. त्यावर लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला निर्णय घेणार आहेत. nविरोधी पक्ष या मुद्यावरही हंगामा करू शकतात. याबरोबरच संसदेत बसपा खा. दानिश अली यांच्याबाबत भाजप खा. रमेश विधुडी यांनी केलेल्या टिप्पणीवर अद्याप कोणतीही कारवाई झालेली नाही. विरोधक हा मुद्दाही उचलून धरू शकतात. 

बृजभूषण यांची क्लीन चिट गाजणार

महिला कुस्तीपटूंशी गैरवर्तन केल्याच्या प्रकरणात भाजपचे खा. बृजभूषण शरण सिंह यांना क्लीन चिट देण्याचे प्रकरणही गाजण्याची शक्यता आहे. सरकारने लोकसभेत सादर केलेले भारतीय दंड संहिता विधेयक सरकार लोकसभा व राज्यसभेत पारित करून घेईल. भारतीय पिनल कोडच्या जागी भारतीय न्याय संहिता २०२३, सीआरपीसीच्या जागी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ व एव्हिडन्स ॲक्टच्या जागी भारतीय साक्ष विधेयक २०२३ला गृह मंत्रालयाच्या संसदीय समितीने यापूर्वीच मंजुरी दिलेली आहे. आता संसदेच्या दोन्ही सभागृहांत संसदेच्या याच अधिवेशनात तिन्ही विधेयके पारित करण्यात येतील.

टॅग्स :ElectionनिवडणूकParliamentसंसद