शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

Election Result 2022: पाच राज्यांचा आज फैसला! उत्तर प्रदेशात भाजपची प्रतिष्ठा लागली पणाला

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 10, 2022 06:55 IST

पंजाबमध्ये आम आदमी पक्षाला संधी मिळेल का? मतदानोत्तर चाचण्यांनी उत्तर प्रदेशात भाजप सत्ता राखेल, असा कौल दिला असला तरी प्रत्यक्षात काय निकाल हाती येतात, याची उत्सुकता देशाला लागून राहिली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : राष्ट्रीय राजकारणाची पुढील दिशा ठरवण्याची ताकद असलेल्या उत्तर प्रदेश विधानसभेसह पाच राज्यांच्या निवडणूक निकालांत जनमत कोणाच्या बाजूने याचे उत्तर उद्या, गुरुवारी मिळणार आहे. मतदानोत्तर चाचण्यांनी उत्तर प्रदेशात भाजप सत्ता राखेल, असा कौल दिला असला तरी प्रत्यक्षात काय निकाल हाती येतात, याची उत्सुकता देशाला लागून राहिली आहे.

उत्तराखंड, मणिपूर, उत्तर प्रदेशात भाजपचीच सत्ता येण्याची शक्यता असल्याचा निष्कर्ष बहुतांश मतदानोत्तर चाचण्यांनी काढला आहे. यंदा झालेल्या विधानसभा निवडणुकांत उत्तर प्रदेशमध्ये भाजपसमोर समाजवादी पक्षाने मोठे आव्हान उभे केले आहे. बसप, काँग्रेस व इतर पक्षांना किती मते मिळतात याचाही निवडणूक निकालांवर परिणाम होईल.गोव्यात काँग्रेस व भाजप यांच्यात तुल्यबळ लढत होऊन तिथे त्रिशंकू विधानसभा अस्तित्वात येण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.  पंजाबमध्ये गटबाजीने ग्रस्त असलेल्या काँग्रेसला हरवून आम आदमी पक्ष  सत्तेवर येऊ शकतो, असे  भाकीत जनमत चाचण्यांमध्ये वर्तविण्यात आले आहे. 

काँग्रेसची अवस्था : या पाचही राज्यांत काँग्रेसची अवस्था अधिक दयनीय होते की हा पक्ष आपली पडझड काही प्रमाणात रोखण्यात यशस्वी होतो का हेही या निकालांतून स्पष्ट होणार आहे.

प्रत्येक कर्मचाऱ्याला सॅनिटायझर, मास्कn पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत मतदानाच्या वेळी कोरोना प्रतिबंधक नियमांचे काटेकोर पालन करण्यात आले तशीच स्थिती मतमोजणीच्या वेळी देखील राहाणार आहे. ज्यांना सर्दी आहे किंवा ताप आहे अशांना मतमोजणी केंद्रात प्रवेश देण्यात येणार नाही. 

n मतमोजणीच्या प्रक्रियेत असलेल्या कर्मचाऱ्याला मास्क, सॅनिटायझर, फेस शिल्ड व हातमोजे दिले जाणार आहेत असे निवडणूक आयोगाने सांगितले.

टॅग्स :Uttar Pradesh Assembly Election 2022उत्तर प्रदेश विधानसभा निवडणूक २०२२Goa Assembly Election 2022गोवा विधानसभा निवडणूक २०२२Punjab Assembly Election 2022पंजाब विधानसभा निवडणूक २०२२