शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

महाराष्ट्रातून 6 जणांची राज्यसभेवर बिनविरोध निवड; सोनिया गांधी, जेपी नड्डाही राज्यसभा खासदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2024 18:13 IST

महाराष्ट्रातून भाजपचे 3 तर शिवसेना, NCP, काँग्रेसच्या प्रत्येकी एका उमेदवाराची बिनविरोध निवड...

महाराष्ट्रातील 6 जणांची राज्यसभा खासदार म्हणून बिनविरोध निवड झाली आहे. आज अर्थात मंगळवारी दुपारी 3 वाजेपर्यंत या 6 जागांवर नामांकन मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. मात्र या कालावधीत ना कुठले नवे नामांकन आले ना कुणी आपले नाव मागे घेतले. यामुळे 6 खासदारांची नावे राज्यसभेसाठी बिनविरोध पक्की झाली आहेत. यात भारतीय जनता पक्षाच्यात तीन, तर शिवसेना, एनसीपी आणि काँग्रेसच्या प्रत्येकी एक-एक नेत्याचा समावेश आहे.

महाराष्ट्रातून या नेत्यांची झाली बिनविरोध निवड -भाजपकडून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ अजीत गोपछडे, शिवसेनेकडून मिलिंद देवरा, एनसीपीकडून प्रफुल पटेल तर काँग्रेसकडून चंद्रकांत हंडोरे यांची बिनविरोध निवड झाली आहे.

राजस्थानातून सोनिया गांधी यांची बिनविरोध निवड -काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांची राजस्थानातून राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाली आहे. याशिवाय, भाजपचे चुन्नीलाल गरासिया आणि मदन राठोड यांचीही राज्यसभेसाठी बिनविरोध निवड झाली आहे. पीटीआय या वृत्तसंस्थेने विधानसभा सचिव महावीर प्रसाद शर्मा यांच्या हवाल्याने दिलेल्या वृत्तानुसार, मंगळवारी नामांकन मागे घेण्याचा शेवटचा दिवस होता. कुठलेही नवे नामांकन आले नाही. यामुळे हे तीनही नेत्यांची राज्यसभेसाटी बिनविरोध निवड झाली आहे. महत्वाची म्हणजे, उच्च सभागृहात बसण्याची सोनिया गांधी यांची पहिलीच वेळ असणार आहे.

गुजरातमधून जे पी नड्डा राज्यसभेवर -याच बरोबर, भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांची गुजरातमधून राज्यसभेसाठी निवड झाली आहे. महत्वाचे म्हणजे, भाजपमध्ये गुजरातचे महत्व पूर्वीच्या तुलनेत खूप अधिक वाढताना दिसत आहे.

मध्य प्रदेशातून या नेत्यांची निवड -मध्य प्रदेशातून भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवारांची बिनविरोध निवड झाली आहे. यात भाजपचे एल मुरुगन, उमेश नाथ महाराज, माया नारोलिया, बंसीलाल गुर्जर, तर काँग्रेसचे अशोक सिंह यांचा समावेश आहे. यांची बिनविरोध निवड झाल्याचे घोषित करण्यात आले आहे. 

टॅग्स :Rajya Sabhaराज्यसभाElectionनिवडणूकAshok Chavanअशोक चव्हाणJ P Naddaजगत प्रकाश नड्डाSonia Gandhiसोनिया गांधी