शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

गुजरातेत इलेक्शन? काही माहितीच नाही, या जिल्ह्यातील लोकांची अशीही व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2022 10:42 IST

देशाला मीठ पुरविणाऱ्या जिल्ह्याची स्थिती

रमाकांत पाटीलपाटली (सुरेंद्रनगर) : देशात ५-जी सेवा सर्वप्रथम गुजरातमध्ये सुरू झाली असली तरी आणि ‘गुजरात मॉडेल’ची कितीही चर्चा सुरू असली तरी येथील मीठ उत्पादक आगरियांची अवस्था मात्र अतिशय दयनीय आहे. गुजरात विधानसभेसाठी मतदान अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपले असताना ‘चुटणी क्यारे छे, अमने नई खबर...’ अशा प्रतिक्रिया खाराघोडा या भागातील मिठाच्या रणात फिरताना ऐकायला मिळाल्या.

सुरेंद्रनगर जिल्ह्यातील पाटली गावच्या पुढे शेकडो एकर क्षेत्रात मिठाचे रण आहे. देशात लागणाऱ्या एकूण मिठाचे २५ टक्के मीठ या भागात तयार होते. या वस्तींमध्ये कुठलीही सुविधा नाही.  शिक्षणासाठी हंगामी शाळा सुरू असल्या तरी त्या नावालाच आहेत. या भागात आठ दिवसांतून टँकरने पाणीपुरवठा होतो. त्यामुळे आहे त्या भांड्यामध्ये पाणी भरतात आणि ते पाणी आठ दिवस पुरविण्यासाठी त्यांची कसरत असते. आरोग्य सेवा तर नाहीच, अशा एक ना अनेक प्रश्नांना सामोरे जात हे आगरिक मीठ उत्पादनासाठी गुंतले आहेत.

जेवणाच्या बदल्यात मतदान अन् रक्कमnसुरेंद्रनगर जिल्ह्यातील दसाडा विधानसभा मतदारसंघाच्या कार्यक्षेत्रात १० हजार आगरिक असून, त्यांना मतदानाच्या दिवशी ट्रक अथवा इतर वाहनाने राजकीय पक्षाचे नेते मतदान केंद्रावर आणतात. nत्यांना बुडीत मजुरीची रक्कम, तसेच जेवण दिले जाते आणि कसे व कुठे मतदान करावे त्याबाबत मार्गदर्शन करून त्यांच्याकडून मतदान करून घेतले जाते, अशी माहिती या भागातील जाणकार लक्ष्मीकांतभाई चव्हाण यांनी दिली.

निवडणुकीचा कुठलाही मागमूस नाहीगुजरात निवडणुकीचा कुठलाही मागमूस तेथे दिसून आला नाही.  खोडाभाई वनाभाई ठाकूर यांनी सांगितले,  ‘‘निवडणूक कधी आहे ते आपल्याला माहीत नसल्याचे त्यांनी सांगितले. त्यांची पत्नी सीताबेन यांनाही निवडणुकीची तारीख माहीत नाही. एवढेच नव्हे तर आपल्या भागातील आमदार, खासदार आणि मंत्र्यांबाबत व मुख्यमंत्र्यांचे नावही त्यांना माहीत नाही.

टॅग्स :Gujarat Assembly Election 2022गुजरात विधानसभा निवडणूक 2022Electionनिवडणूक