शहरं
Join us  
Trending Stories
1
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
2
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
3
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
4
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
5
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
6
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
7
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
8
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
9
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
10
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
11
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
12
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
13
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी
14
आजचे राशीभविष्य- १४ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस फायद्याने भरलेला, पण हितशत्रूंपासून सावध राहा
15
गुन्हेगारी पार्श्वभूमी, तुरुंगवास आणि..., कोण आहे टॉमी रॉबिन्सन, ज्याच्या आवाहनानंतर लंडनमध्ये निघाला लाखोंचा मोर्चा
16
World Boxing Championship: भारताच्या लेकीचा 'गोल्डन पंच' ! जास्मिन लंबोरियाने बॉक्सिंग चॅम्पियनशिपमध्ये जिंकलं सुवर्ण
17
"तुम्हाला काय वाटतं याला काही महत्त्व नसतं..."; IND vs PAK सामन्यावर सुनील गावसकरांचे मत
18
लंडनमध्ये १ लाखाहून अधिक स्थलांतर विरोधी आंदोलक रस्त्यावर उतरले, अनेक पोलिसांवर हल्ला
19
मतपेढीच्या राजकारणामुळे ईशान्य भारताचे मोठे नुकसान : पंतप्रधान मोदी
20
पोलिसांच्या ८ तासांच्या ड्युटीचे काय झाले? मनुष्यबळ वाढल्यास ८ तासांची ड्युटी शक्य

प. बंगालमध्ये प्रचारबंदी करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय पक्षपाती

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2019 05:49 IST

मोदी सरकारच्या काळात निवडणूक आयोग आपले स्वातंत्र्यच हरवून बसला आहे, अशी टीका काँग्रेससह विरोधी पक्षांनी गुरुवारी केली.

नवी दिल्ली : पश्चिम बंगालमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या गुरुवारच्या दोन सभा झाल्यानंतरच प्रचारबंदी लागू करण्याचा निवडणूक आयोगाचा निर्णय अतिशय पक्षपाती आहे. मोदी सरकारच्या काळात निवडणूक आयोग आपले स्वातंत्र्यच हरवून बसला आहे, अशी टीका काँग्रेससह विरोधी पक्षांनी गुरुवारी केली. पंतप्रधान मोदी यांच्या शुक्रवारी सभा झाल्यानंतर मगच प्रचारबंदी करण्यास विरोधकांनी आक्षेप घेतला आहे.काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, द्रमुक, समाजवादी पक्ष, बहुजन समाजवादी पक्ष, तेलगू देसम, राष्ट्रीय जनता दल, नॅशनल कॉन्फरन्स या पक्षांनी निवडणूक आयोगाने प. बंगालमध्ये प्रचारबंदीचा निर्णय भाजपच्या दबावाखाली घेतला असल्याची टीका केली आहे. निवडणूक आयोगामार्फत भाजप प. बंगालमध्ये आणीबाणीसदृश्य स्थिती निर्माण करू पाहत आहे, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसने केला आहे.निवडणूक आयोग सध्या भाजपसाठी वेगळी व अन्य विरोधी पक्षांसाठी वेगळी पट्टी वापरत आहे, अशी टीका द्रमुकचे नेते एम. के. स्टॅलिन यांनी केली आहे. निवडणूक आयोगाचा निर्णय हा लोकशाहीवरील काळा डाग असल्याची टीका काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी केली. ते म्हणाले की, कोलकात्यात हिंसाचार घडवून आणणाऱ्या भाजपच्या गुंडांना शिक्षा करण्याऐवजी निवडणूक आयोगाने लोकशाहीतील निवडणूक प्रक्रियेलाच शिक्षा सुनावली आहे. या आयोगामार्फत निष्पक्षपाती निवडणुका होतील का, याविषयीच आता शंका निर्माण झाली आहे.भाजपने कटकारस्थान रचूनच प. बंगालमध्ये हिंसाचार घडवून आणला आणि निवडणूक आयोग मात्र मोदी यांच्या सभेनंतर प्रचारबंदी करण्याचे आदेश देतो, हा लोकशाहीसाठी धोकादायक प्रकार आहे, अससे बसपच्या नेत्या मायावती म्हणाल्या. नॅशनल कॉन्फरन्सचे नेते ओमर अब्दुल्ला म्हणाले की, कोलकात्यात काय घडले, ते प. बंगालमधील जनतेने पाहिले आहे. त्यामुळे ती जनता तृणमूल काँग्रेसलाच विजयी करील, अशी खात्री मला आहे.

ममता यांनी मानले आभारया सर्व पक्षांनी पाठिंबा दिल्याबद्दल प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी त्या नेत्यांचे आभार मानले आहेत. लोकशाहीवर भाजपतर्फे हल्ला होत असताना तुम्ही सर्वांनी आम्हाला तसेच प. बंगालमधील जनतेला पाठिंबा दिला, त्याबद्दल मी आपले आभार मानते, असे ममता म्हणाल्या. त्यांनी आज शांतता मिरवणूकही काढली होती.

टॅग्स :Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूकWest Bengal Lok Sabha Election 2019पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक 2019Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगwest bengalपश्चिम बंगाल