शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

"आम्ही कारवाई करायला सुरुवात केली तर..."; भाजप उमेदवाराला निवडणूक आयोगाने दिला इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 7, 2025 17:28 IST

Delhi Election: निवडणूक आयुक्तांनी भाजप उमेदावाराने महिलांबाबत केलेल्या अपमानजक वक्तव्याबाबत इशारा दिला आहे.

Election Commission : दिल्ली विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजल्यापासून देशाच्या राजधानीत प्रचाराला जोरदार सुरुवात झाली आहे. भाजप, आम आदमी पक्ष यांच्यात मुख्य लढत होणार आहे. अशातच भाजपाचे माजी खासदार आणि कालकाजी विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी केलेल्या वादग्रस्त विधानांमुळे दिल्लीतलं राजकीय वातावरण तापलं आहे. रमेश बिधुरी यांनी काँग्रेसच्या सचिव प्रियांका गांधी आणि दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी मार्लेना यांच्याबाबत अश्लाघ्य विधाने केली होती. त्यावर आता केंद्रीय निवडणूक आयोगाने भाष्य केलं आहे.

मंगळवारी मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी पत्रकार परिषदेत घेत दिल्ली निवडणुकीसाठी ५ फेब्रुवारीला मतदान होणार असून ८ फेब्रुवारीला त्याचा निकाल लागणार असल्याचे सांगतिले. यावेळी त्यांना रमेश बिधुरी यांच्या वादग्रस्त वक्तव्याबाबत प्रश्नही विचारण्यात आले. निवडणूक आयुक्तांनी प्रियंका गांधी आणि मुख्यमंत्री आतिशी यांच्यावरील विधानांचा निषेध करत त्या लज्जास्पद असल्याचे म्हटलं.

"महिलांबद्दल कुणी काही चुकीचं बोललं तर त्याचा निषेध करावा तितका कमी आहे. अशा घाणेरड्या कमेंट करू नयेत. आम्ही अत्यंत कठोर मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. आम्ही सध्या आमच्या जिल्हा अधिकाऱ्याला फौजदारी कारवाई करण्यापासून रोखत आहोत. आम्ही फौजदारी कारवाई करू लागलो तर चांगले होणार नाही. याबाबत मतदारांना निर्णय घेऊ द्या. मी इशारा देत आहे. मुलांचा अजिबात वापर करु नका. एकीकडे सबलीकरण होत आहे तर दुसरीकडे महिलांना असे बोलले जात आहे. गरज भासल्यास आम्ही  कारवाई करू," असं मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी म्हटलं.

भाजपचे उमेदवार रमेश बिधुरी यांनी रोहिणीतील भाजपच्या परिवर्तन रॅलीत बोलताना मुख्यमंत्री आतिशी यांच्याबद्दल अपमानास्पद वक्तव्य केलं होतं. "आतिशी आधी मार्लेना होत्या, आता त्या सिंह झाल्या आहेत. त्यांनी स्वतःचा बापच बदलला. आतिशी यांच्या वडिलांनी अफझल गुरूची फाशी रोखण्याचा प्रयत्न केला होता. दहशतवादी अफझल गुरूमुळे अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला होता," असं रमेश बिधुरी म्हणाले. अतिशी यांच्या वडिलांनी अफझल गुरूचे समर्थन केले होते आणि त्यांनी अफझल गुरूचा बचाव केल्याचा आरोपही बिधुरी यांनी केला.

दरम्यान, त्याआधी रमेश बिधुरी यांनी काँग्रेसच्या खासदार प्रियांका गांधी वाड्रा यांच्याबाबत आक्षेपार्ह विधान केले होते. मी निवडून आलो तर प्रियांका गांधींच्या गालासारखे गुळगुळीत रस्ते बनवेन, असे वक्तव्य बिधुरींनी केले होते. टीका झाल्यानंतर बिधुरी यांनी त्यांच्या वक्तव्याबाबत दिलगिरी व्यक्त केली. माझ्या शब्दांमुळे जर माता-भगिनींना किंवा कुणाच्याही भावना दुखावल्या असतील तर दिलगिरी व्यक्त करतो, असं बिधुरी म्हणाले.

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगdelhiदिल्लीPriyanka Gandhiप्रियंका गांधी