शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

तेलंगणात KCR सरकारला मोठा झटका, निवडणूक आयोगाने रायथू बंधू योजनेला दिलेली परवानगी घेतली मागे!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 27, 2023 13:02 IST

रायथू बंधू योजनेला निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर काँग्रेसने विरोध केला होता.

हैदराबाद : तेलंगणामध्ये ३० नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारची रायथू बंधू योजना सुरू ठेवण्याची दिलेली परवानगी मागे घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला आहे. निवडणूक आयोगाने आपल्या नवीन आदेशात म्हटले आहे की, जोपर्यंत राज्यात निवडणूक आचारसंहिता लागू आहे, तोपर्यंत या योजनेंतर्गत कोणत्याही प्रकारची आर्थिक मदत दिली जाणार नाही. 

रायथू बंधू योजनेला निवडणूक आयोगाने परवानगी दिल्यानंतर काँग्रेसने विरोध केला होता. तेलंगणाच्या केसीआर सरकारने २४ नोव्हेंबरपासून रयथू बंधू योजनेंतर्गत राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये अनुदानाचे पैसे वितरित करण्यासाठी निवडणूक आयोगाकडे परवानगी मागितली होती. निवडणूक आयोगानेही याला मान्यता दिली होती. मात्र, याला काँग्रेससह अन्य पक्षांनी विरोध केला होता. 

यासंदर्भात काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. या योजनेमुळे मतदारांवर प्रभाव पडू शकतो, असा युक्तिवाद काँग्रेसने केला होता. यामुळे निवडणूक आयोगाला केसीआर सरकारला दिलेली परवानगी मागे घ्यावी लागली. दरम्यान, रायथू बंधू योजनेअंतर्गत, तेलंगणा सरकारद्वारे राज्यातील प्रत्येक शेतकऱ्याच्या बँक खात्यात प्रति एकर पाच हजार रुपये दराने पैसे हस्तांतरित केले जातात. 

या योजनेची रक्कम वर्षातून दोनदा शेतकऱ्यांच्या बँक खात्यात हस्तांतरित केली जाते. अशा प्रकारे वर्षभरात शेतकऱ्यांच्या खात्यात १० हजार रुपये जमा होतात. मीडिया रिपोर्ट्सनुसार, या योजनेअंतर्गत तेलंगणा सरकारने आतापर्यंत राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यात ७० हजार कोटी रुपये हस्तांतरित केले आहेत आणि जवळपास ६० लाख शेतकऱ्यांना त्याचा फायदा झाला आहे.

टॅग्स :K Chandrashekar Raoके चंद्रशेखर रावTelanganaतेलंगणाtelangana assembly electionतेलंगणा विधानसभा निवडणूक २०२३Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग