शहरं
Join us  
Trending Stories
1
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
2
विशेष लेख: चला, सगळे मिळून स्त्री-शक्तीला सक्षम करूया!
3
विशेष लेख: पंजाबमधल्या भगव्या छावणीत आता ‘काँग्रेसयुक्त भाजप’!
4
अग्रलेख: स्वल्पविरामाचा पूर्णविराम व्हावा! तात्पुरत्या युद्धविरामाची घोषणा अन् अख्ख्या जगाला दिलासा
5
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
6
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
7
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
8
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
9
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
10
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
11
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
12
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
13
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
14
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
15
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
16
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
17
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
18
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
19
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
20
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी निवडणूक आयोगाचे पथक प. बंगालमध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2020 02:11 IST

आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांशी चर्चा

कोलकाता : पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या पूर्वतयारीकरिता पाहणीसाठी निवडणूक उपायुक्त सुदीप जैन यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय निवडणूक आयोगाचे एक पथक त्या राज्यात आले आहे. या पथकाने त्या राज्यातील दक्षिण व उत्तर भागातील काही जिल्हाधिकारी, आयएएस अधिकाऱ्यांची भेट घेऊन चर्चाही केली. बुधवारी या पथकाचे दोन दिवसांच्या दौऱ्यासाठी आगमन झाले. पश्चिम बंगालमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होतील, त्या वेळीही कोरोना साथ काही प्रमाणात कायम असेल, अशी अटकळ आहे. त्यामुळे ही संभाव्य स्थिती लक्षात घेऊन केंद्रीय निवडणूक आयोगाचे पथक राज्याचे आरोग्य सचिव, गृह सचिव यांच्याशीही चर्चा करणार आहे.आगामी विधानसभा निवडणुकांची पूर्वतयारी करताना हजारो मतदान केंद्रांवर सर्व सुविधा कशा पुरविता येतील याचा विचारही आयोगाचे पथक करणार आहे. पूर्वतयारीसंदर्भात चर्चा करण्यासाठी हे पथक राजकीय नेत्यांनाही भेटणार आहे.केंद्रीय राखीव दलाचे जवान तैनात करा : भाजपपश्चिम बंगालमध्ये आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मोठ्या प्रमाणावर हिंसाचार होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रचारमोहिमेच्या काळापासूनच या राज्यात केंद्रीय राखीव पोलीस दलांचे जवान तैनात करण्यात यावेत, अशी मागणी भाजपच्या एका शिष्टमंडळाने केंद्रीय निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांची नुकतीच भेट घेऊन केली होती. मात्र, भाजपचे हे आरोप तृणमूल काँग्रेसने फेटाळून लावले होते.

टॅग्स :west bengalपश्चिम बंगालBJPभाजपा