शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

आचारसंहिता उल्लंघनप्रकरणी निवडणूक आयोगाने मागितला अहवाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2017 22:39 IST

अखेरच्या टप्प्यातील मतदानानंतर आता निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रचारादरम्यान झालेल्या आचारसंहिता उल्लंघनांबाबतचा अहवाल मागवला आहे

अहमदाबाद -  गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्याचे आज मतदान संपले. अखेरच्या टप्प्यातील मतदानानंतर आता निवडणूक आयोगाने गुजरात विधानसभा निवडणुकीच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडून प्रचारादरम्यान झालेल्या आचारसंहिता उल्लंघनांबाबतचा अहवाल मागवला आहे. निवडणूक आयोगाने यासंदर्भात पत्रकार परिषद घेऊन माहिती दिली. यावेळी आयोगाने म्हटले की, बुधवारी रात्री काँग्रेसचे एक शिष्टमंडळ आपल्या आरोपांसह निवडणूक आयोगाकडे आले होते. त्यानंतर आयोगाने यावर कारवाई करीत मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांना गुरुवारी दुपारपर्यंत या प्रकरणाचा अहवाल सोपवण्यास सांगितले होते. या प्रकरणी आलेल्या तक्रारींवर अजूनही चौकशी सुरु असल्याचे निवडणूक आयोगाकडून सांगण्यात आले आहे. 

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काही दिवसांपूर्वी पाणबुडी उद्घाटनाच्या कार्यक्रमात उपस्थिती लावल्याबद्दलचे एक प्रकरण आचारसंहितेच्या उल्लंघनाशी निगडित असल्याचे निवडणूक आयोगाने यावेळी सांगितले. हे प्रकरण अद्याप एमसीसीच्या अखत्यारित असून यासाठी आयोगाकडून कुठलीही परवानगी घेण्यात आलेली नव्हती. या मुद्द्यांवर भाजपचे एक शिष्टमंडळ गुरुवारी आपली बाजू मांडण्यासाठी आयोगाकडे आले होते. मात्र, यावर आयोगाकडून चौकशी केल्यानंतरच निर्णय घेतला जाईल असे स्पष्ट करण्यात आले.

भाजपाने निवडणूक आयोगाला कळसूत्री बाहुली बनवले : काँग्रेस गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी आज मतदान होत आहे. दरम्यान, कॉंग्रेसने पत्रकार परिषद घेऊन आज भाजपा आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केला. मतदानानंतर पंतप्रधान मोदींचा रोड शो म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं सुरजेवाला यांनी सांगितलं. निवडणूक आयोग पंतप्रधान मोदींच्या सचिवाप्रमाणे काम करत आहे, ही निवडणूक आयोगासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे अशा शब्दात सुरजेवाला यांनी टीका केली आहे. 

राहुल गांधींच्या मुलाखतींमुळे आचारसंहितेचा भंग, निवडणूक आयोगाने बजावली नोटीस-

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानापूर्वी राहुल गांधी यांच्या प्रसारित झालेल्या मुलाखतींमुळे आचारसंहितेचा भंग झाला असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. तसेच या नोटिशीला 18 डिसेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच ही मुलाखत प्रसारित करणाऱ्या स्थानिक गुजराती वाहिन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत. राहुल गांधी यांची मुलाखत काही गुजराती वाहिन्यांवरून प्रसारित झाली होती. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने राहुल गांधी यांच्या मुलाखती प्रसारित करण्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांना 18 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या प्रकरणी आपली बाजू मांडण्याची मुदत देण्यात आली आहे. या काळात त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा विचार निवडणूक आयोगाकडून करण्यात येऊ शकतो.  याबाबत गुजरातचे मुख्य निवडणूक आयुक्त बी. बी. स्वाइन म्हणाले, राहुल गांधींच्या मुलाखतीच्या प्रसारणाबाबत  आम्हाला तक्रार मिळाली आहे. या मुलाखतीची डीव्हीडी आम्ही मिळवली असून, या प्रकरणाची चौकशी होईल. त्यानंतर नियमानुसार कारवाई केली जाईल.  

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017