शहरं
Join us  
Trending Stories
1
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
2
राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
3
राहुल गांधी पंतप्रधान मोदींसोबत चर्चेसाठी तयार, भाजपाने दिले प्रत्युत्तर; म्हणाले, ...
4
PM Narendra Modi Interview: उद्धव ठाकरेंना बाळासाहेबांचा वारसा सांगण्याचा अधिकार आहे का?; मोदींचा थेट सवाल
5
वीज आणि पिठाचे भाव गगनाला भिडले, PoK मध्ये संघर्ष; संतप्त जमाव रस्त्यावर, पोलिसाचा मृत्यू
6
Chandrashekhar Bawankule : "उद्धव ठाकरे यांच्यात हिंमत असेल तर..."; चंद्रशेखर बावनकुळे यांचं जाहीर आव्हान
7
तुम्ही औरंगजेबाचे फॅन आहात का?; संजय राऊतांच्या प्रश्नावर उद्धव ठाकरेंचा खोचक टोला
8
'धारावी मॉडेल मी यशस्वी केलं, एसीमध्ये बसलेल्यांनी बोलू नये'; राहुल शेवाळेंची ठाकरेंवर टीका
9
साप्ताहिक राशीभविष्य: ५ राशींना शुभदायी, लाभाच्या संधी; थकीत येणी मिळतील, सौभाग्याचा काळ!
10
Exclusive: 'बाळासाहेबांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याची प्रतिष्ठा मी जपली…', पंतप्रधान नरेंद्र मोदींनी स्पष्टच सांगितलं
11
'या' गोष्टींमुळे सुशांत सिंह राजपूत मृत्यूपूर्वी होता त्रस्त, मनोज वाजपेयी यांचा मोठा खुलासा, म्हणाले....
12
ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली, रस्त्यावर मोठा खड्डा पडला, एकाचा मृत्यू, दोन गंभीर
13
रेस्टॉरंटमध्ये झाली नजरानजर अन्...; 4 महिने अमिराला डेट करणाऱ्या अब्दु रोजिकची लव्हस्टोरी
14
त्यांची शिवसेना म्हणजे 'एसंशी'; उद्धव ठाकरेंचा एकनाथ शिंदेंना टोला
15
Exclusive:...म्हणून अजित पवार, एकनाथ शिंदे आमच्यासोबत आले; पंतप्रधान मोदींनी सांगितलं नेमकं काय घडलं!
16
Exclusive: राज ठाकरे आमच्यासाठी नवीन नाहीत, केवळ सत्तेसाठी एकत्र आलेलो नाही; पंतप्रधान मोदींची 'मन(से) की बात'
17
राहुल गांधी काय पंतप्रधान पदाचे उमेदवार आहेत का? मोदींसोबतच्या चर्चेवर स्मृती इराणींचा टोला
18
Exclusive: मेक इन इंडिया योजनेचा देशाला किती फायदा झाला? पंतप्रधान मोदींनी स्पष्टच सांगितले
19
आजचे राशीभविष्य - १२ मे २०२४; व्यापारात प्रगती व यश मिळू शकेल; धनलाभ होईल
20
बुलेट्स कसाबच्या नव्हत्या तर कोणाच्या? प्रकाश आंबेडकर यांचा उज्ज्वल निकम यांना खडा सवाल

निवडणूक आयोगाला लाज वाटायला हवी, भाजपाने निवडणूक आयोगाला कळसूत्री बाहुली बनवले : काँग्रेस

By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2017 2:15 PM

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी आज मतदान होत आहे. दरम्यान, कॉंग्रेसने पत्रकार परिषद घेऊन आज भाजपा आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केला. 

नवी दिल्ली: गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील 93 जागांसाठी आज मतदान होत आहे. दरम्यान, कॉंग्रेसने पत्रकार परिषद घेऊन आज भाजपा आणि निवडणूक आयोगावर जोरदार हल्लाबोल केला. निवडणूक आयोग पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाच्या दबावाखाली काम करत असल्याचा गंभीर आरोप कॉंग्रेसचे प्रवक्ता रणदीप सुरजेवाला यांनी केला. 

मतदानानंतर पंतप्रधान मोदींचा रोड शो म्हणजे आचारसंहितेचा भंग असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत निवडणूक आयोगाकडे तक्रार करणार असल्याचं सुरजेवाला यांनी सांगितलं. निवडणूक आयोग पंतप्रधान मोदींच्या सचिवाप्रमाणे काम करत आहे, ही निवडणूक आयोगासाठी लाजिरवाणी गोष्ट आहे अशा शब्दात सुरजेवाला यांनी टीका केली आहे. 

राहुल गांधींची मुलाखत काल काही चॅनलवर प्रदर्शित झाल्यानंतर निवडणूक आयोगाने त्यांना नोटीस बजावली होती, निवडणूक आयोगाची ही दुटप्पी भूमीका असल्याचा आऱोप यावेळी कॉंग्रेसने केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज साबरमतीमधील राणिप येथील केंद्रावर मतदान केलं. मतदानानंतर मोदी केंद्राबाहेर आले. त्यावेळी लोकांनी रस्त्यावर तुफान गर्दी केली होती, यावेळी मोदींच्या नावाच्या घोषणा देण्यात आल्या, मोदींनीही कारच्या फूटबोर्डवर उभं राहून लोकांना अभिवादन केलं. एकाप्रकारे रोड शोचं स्वरुप प्राप्त झालं होतं.

राहुल गांधींच्या मुलाखतींमुळे आचारसंहितेचा भंग, निवडणूक आयोगाने बजावली नोटीस-

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि अखेरच्या टप्प्यातील मतदानापूर्वी राहुल गांधी यांच्या प्रसारित झालेल्या मुलाखतींमुळे आचारसंहितेचा भंग झाला असल्याचे सांगत निवडणूक आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस बजावली आहे. तसेच या नोटिशीला 18 डिसेंबरपर्यंत उत्तर देण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत. तसेच ही मुलाखत प्रसारित करणाऱ्या स्थानिक गुजराती वाहिन्यांविरोधात गुन्हा दाखल करण्याचे आदेशही निवडणूक आयोगाने दिले आहेत. राहुल गांधी यांची मुलाखत काही गुजराती वाहिन्यांवरून प्रसारित झाली होती. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने राहुल गांधी यांच्या मुलाखती प्रसारित करण्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती. त्यानंतर या तक्रारीची दखल घेत निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. राहुल गांधी यांना 18 डिसेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत या प्रकरणी आपली बाजू मांडण्याची मुदत देण्यात आली आहे. या काळात त्यांनी समाधानकारक उत्तर न दिल्यास त्यांच्याविरोधात कारवाई करण्याचा विचार निवडणूक आयोगाकडून करण्यात येऊ शकतो.  याबाबत गुजरातचे मुख्य निवडणूक आयुक्त बी. बी. स्वाइन म्हणाले, राहुल गांधींच्या मुलाखतीच्या प्रसारणाबाबत  आम्हाला तक्रार मिळाली आहे. या मुलाखतीची डीव्हीडी आम्ही मिळवली असून, या प्रकरणाची चौकशी होईल. त्यानंतर नियमानुसार कारवाई केली जाईल.  

 

 

 

टॅग्स :ElectionनिवडणूकGujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017