शहरं
Join us  
Trending Stories
1
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
2
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
3
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
4
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
5
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
6
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
7
ओदिशा-झारखंड सीमेवर नक्षलवाद्यांनी घडवला स्फोट, एक जवान जखमी
8
इरानमध्ये अमेरिकेचे रेस्क्यू मिशन; पण मदतीला धावली इस्रायलची 'सायरेत मतकल'! कोण आहे ही सीक्रेट फोर्स?
9
डोनाल्ड ट्रम्प यांची जीभ घसरली आणि अमेरिकेत राजकीय भूकंप! राष्ट्राध्यक्षपद जाण्याची भीती; काय आहे तो '२५वा घटना दुरुस्ती' नियम?
10
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
11
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा धक्कादायक Video व्हायरल
12
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
13
प्रसिद्ध टीव्ही अभिनेत्रीने उचललं टोकाचं पाऊल, आदल्या रात्रीच झालेला पतीसोबत वाद
14
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
15
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
16
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
17
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
18
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
19
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
20
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक आयोगाने विरोधी पक्षांची व्हीव्हीपॅटबाबतची मागणी फेटाळली 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 22, 2019 13:50 IST

ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत आज बोलावण्यात आलेल्या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.

नवी दिल्ली  - गुरुवारी होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणी वेळी सर्वप्रथम व्हीव्हीपॅट मशीनमधील मतांची मोजणी करून त्याची ईव्हीएममधील मतांशी जुळणी करण्याची विरोधी पक्षांची मागणी निवडणूक आयोगाने फेटाळून लावली आहे. ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅटबाबत आज बोलावण्यात आलेल्या बैठकीनंतर निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला आहे. आता गुरुवारी नियोजित वेळापत्रकानुसारच मतमोजणी होणार आहे. आज निवडणूक आयोगाने बोलावलेल्या बैठकीला मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोडांसह निवडणूक आयुक्त अशोक लवासा हेसुद्धा उपस्थित होते. विरोधी पक्षांची मागणी मान्य केली तर मतमोजणीसाठी दोन ते तीन दिवसांचा अवधीही लागू शकतो, याचीही चर्चा या बैठकीत झाली, अशी माहिती सूत्रांनी दिली.  रविवारी लोकसभा निवडणुकीचे मतदान आटोपल्यानंतर विरोधी पक्षांनी ईव्हीएमबाबत शंका घेण्यास सुरुवात केली होती. दरम्यान, मंगळवारी काँग्रेस, एसपी, टीएमसीसह तब्बल 22 विरोधी पक्षांच्या नेत्यांनी मुख्य निवडणूक आयोगाकडे धाव घेत अधिकाऱ्यांशी चर्चा केली होती. तसेच 23  मे रोजी मतमोजणीला सुरुवात होण्यापूर्वी क्रमवारीनुसार न निवडलेल्या कुठल्याही व्हीव्हीपॅट मशीन मधील चिठ्ठ्या आणि ईव्हीएममधील मते यांची तपासणी व्हावी, अशी मागणी केली होती. दरम्यान, स्ट्राँग रूममध्ये ठेवण्यात आलेल्या ईव्हीएमच्या सुरक्षेबाबत व्यक्त करण्यात येत असलेल्या सर्व शंका निवडणूक आयोगाने फेटाळून लावल्या आहेत.  

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगVVPATव्हीव्हीपीएटीLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकाल