शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
4
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
5
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
6
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
7
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
8
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
9
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
10
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
11
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
12
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
13
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
14
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
15
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
16
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
17
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
18
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
19
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
20
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
Daily Top 2Weekly Top 5

Corona in India: आरोग्य मंत्रालय आणि निवडणूक आयोगाची बैठक सुरू, रॅली आणि रोड शोवर लागू शकते बंदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2022 12:20 IST

Assembly Elections 2022: कोरोना विषाणूच्या वाढत्या प्रकरणांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची आज बैठक होत आहे. या बैठकीत गृह मंत्रालय, NITI आयोग आणि आरोग्य मंत्रालयाचे अधिकारी सहभागी होत आहेत.

नवी दिल्ली: देशातील वाढते कोरोना संकट आणि आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालय आणि निवडणूक आयोगाची बैठक सुरू आहे. या बैठकीत केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण गुरुवारी देशातील कोविड-19 च्या परिस्थितीबाबत भारतीय निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांना माहिती देतील. NITI आयोगाचे सदस्य डॉ. व्ही.के. पॉल, मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा आणि गृह मंत्रालयाचे अधिकारी देखील या व्हर्चुअल बैठकीला उपस्थित आहेत. यादरम्यान आरोग्य मंत्रालयाने सादर केलेल्या अहवालावर चर्चा केली जाईल. 

रॅली आणि सभांवर बंदी होणार ?बैठकीत ओमायक्रॉनबाबत आरोग्य मंत्रालयाकडून सादर करण्यात येणाऱ्या अहवालावर निवडणूक आयोग, निती आयोगाचे सदस्य आणि कोरोनावरील टास्क फोर्सचे अध्यक्ष व्ही.के. पॉल यांचे विशेष मत घेणार आहे. या बैठकीत केंद्रीय दलाच्या तैनातीवर गृह मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांशीही चर्चा केली जाईल. निवडणूक आयोगाची सलग दोन दिवस बैठक होत आहे. रॅली आणि रोड शोवर बंदी घालण्याच्या मुद्द्यावरही आयोग व्हीके पॉल यांच्याशी चर्चा करणार आहे.

कोणत्या मुद्द्यांवर चर्चा होणार?

वरील मुद्द्यांसोबतच इतर ज्या बाबींवर चर्चा केली जाईल, त्यात राजकीय पक्षांच्या स्टार प्रचारकांसाठी कोविड-19 शी संबंधित प्रोटोकॉल आणि नियम, उमेदवारी अर्जादरम्यान उमेदवारांसाठी कोविडशी संबंधित नियमांचे पालन, राजकीय पक्षांच्या बैठका आणि इतर मर्यादा यांचा समावेश आहे. डोअर टू डोअर प्रचार आणि मोठ्या रॅली, रोड शो, कार्यक्रम याबाबतचे नियम आणि सक्ती यासारख्या समस्यांवरही चर्चा केली जाईल. अशा स्थितीत बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेतले जाऊ शकतात. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगNIti Ayogनिती आयोग