शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

राहुल गांधी यांना वृत्तवाहिनीच्या मुलाखतप्रकरणी पाठवलेली नोटीस निवडणूक आयोगाने घेतली मागे

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2017 10:04 IST

निवडणूक आयोगाने वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठविलेली नोटीस मागे घेतली आहे.

नवी दिल्ली- निवडणूक आयोगाने वृत्त वाहिनीला दिलेल्या मुलाखतीप्रकरणी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांना पाठविलेली नोटीस मागे घेतली आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या दरम्यान वृत्तवाहिनीला राहुल गांधी यांनी मुलाखत दिली होती. निवडणूक आयोगाने 13 डिसेंबर रोजी राहुल गांधी यांना नोटीस पाठविली होती. राहुल गांधी यांना 18 डिसेंबरपर्यंत संध्याकाळी 5 वाजेपर्यंत उत्तर देण्याचं निवडणूक आयोगाने सांगितलं आहे. राहुल गांधी यांना या नोटीसीचं योग्य उत्तर दिलं नाही, तर त्यांच्यावर कारवाई केली जाऊ शकते.  तसंच राहुल गांधी यांची मुलाखत दाखविणाऱ्या वृत्तवाहिनीच्याविरोधातही तक्रार दाखल करण्याचे आदेश निवडणूक आयोगाने दिले होते.

निवडणूक आयोगानुसार मतदानाच्या एक दिवस आधी मुलाखत दाखविणं आचारसंहीतेचं उल्लंघन आहे. मुलाखत दाखविणाऱ्या प्रत्येक वृत्तवाहिनीविरोधात कारवाई केली जाणार आहे, असं आयोगाने म्हटलं. 

निवडणूक आयोगाने म्हंटलं की, राहुल गांधी यांना ज्याअंतर्गत नोटिस जारी केली होती त्या कायदेशीर तरतुदी पुन्हा तपासून पाहिल्या जातील. नोटीस परत घेण्याबरोबच आयोगाने म्हटलं, निवडणूक आयोगाच्या मते डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक्स मीडियाचा विस्तार अती जास्त झाला आहे. त्यामुळे आरपी अॅक्ट 1951च्या कलम 126 आणि त्या संबंधित इतर तरतुदींवर पुन्हा चर्चा करणं गरजेचं आहे. निवडणूक आयोग लवकरच राजकीय पक्ष, मीडिया आणि इतर पक्षांशी विचारविनिमय करणार आहे.  त्यानंतर कमिटी स्थापन केली जाणार असून ही कमिटी आयोगाला रिपोर्ट सादर करेल. 

प्रचार संपल्यानंतर आचारसंहीतमध्ये राहुल  गांधी यांनी वृत्तवाहिनीला मुलाखत दिल्यामुळे भाजपाने त्याविरोधात निवडणूक आयोगाकडे तक्रार केली होती.  त्याच तक्रारीनंतर आयोगाने राहुल गांधी यांना नोटीस पाठविली होती.  

टॅग्स :Gujarat Election 2017गुजरात निवडणूक 2017Rahul Gandhiराहुल गांधी