शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेत पॅलेस्टिनींसह इतर ७ देशांवर प्रवास बंदी; डोनाल्ड ट्रम्प यांचा मोठा निर्णय
2
LIC ची कोणत्या कंपनीत किती गुंतवणूक? सरकारनं दिली महत्त्वाची माहिती; टाटा, रिलायन्स, अदानीसह कोणत्या कंपन्या?
3
कॅरेबियन समुद्रात अमेरिकन युद्धनौकांनी 'या' देशाला घेरले; ट्रम्प यांनी दिला थेट युद्धाचा इशारा
4
ब्रिटनमध्ये 'नो एन्ट्री' : व्हिसाचे नियम कडक; ६७ टक्क्यांची मोठी कपात, आयटी, हेल्थ प्रोफेशनल्सना मोठा झटका!
5
प्रदूषणावरून संसदेत राजकीय 'युद्धबंदी'! जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरांमध्ये भारताचा वरचा क्रमांक
6
'धुरंधर'च्या यशात अक्षय खन्ना कुठे गायब? अलिबागच्या घराची केली वास्तुशांती; व्हिडीओ व्हायरल
7
ठाकरे बंधू जाहीरनामा, युती एकाच दिवशी जाहीर करणार? शिवाजी पार्क येथे प्रचाराची सांगता सभाही एकत्रित..?
8
१५ दिवसांत १४ हत्या, १७ अल्पवयीन आरोपींचा समावेश; राजधानी दिल्ली वाढत्या गुन्हेगारीनं हादरली
9
दोस्ती कुणाची? कुस्ती कुणाशी? महापालिका निवडणुकीच्या रणधुमाळीचा बिगुल
10
कोवळ्या वयात मित्राला संपवण्याची मानसिकता येते कुठून? मुलांच्या मानसिक आरोग्यावर तातडीने लक्ष देण्याची गरज
11
आजचे राशीभविष्य, १७ डिसेंबर २०२५: चांगली बातमी मिळेल,शक्यतो आज वाद टाळावेत
12
ममता बॅनर्जी यांच्या मतदारसंघातून तब्बल ४५ हजार मतदार हटवले; सत्ताधारी TMC राबवणार मोहीम
13
मुंबईत दोन मोठे विमानतळ, मात्र स्टेट हँगरच नाही; सरकारलाही भाड्याने घ्यावे लागते हँगर!
14
'गांधीजी का ये अपमान नहीं सहेगा हिंदुस्तान'; विरोधकांचा तीव्र आक्षेप, खासदारांची निदर्शने
15
अनंत अंबांनींच्या वनताराला भेटीने मेस्सी आनंदी; प्राण्यांची काळजी घेण्याची पद्धत पाहून प्रभावी
16
१९९७ पासून केलेल्या विकासकामांची यादी, उद्धवसेनेच्या विकासकामांचे श्रेय घेऊ नका : आ. आदित्य ठाकरे
17
मंत्री कोकाटेंची २ वर्षांची शिक्षा कायम; सवलतीच्या घरांसाठी खोटी कागदपत्रे, कोट्यातून फ्लॅट लाटणे भोवले
18
धुक्यात थांबला होता 'काळ' : ७ बस, ३ कार एकमेकांना धडकून १३ जण खाक
19
दुचाकी, ट्रॅक्टरसह साडेतीन एकर शेतीही विकली, तरीही व्याजाचा डोंगर वाढताच... सावकाराचा तगादा; शेतकऱ्याने विकली किडनी
20
नॅशनल हेराल्ड केस : ईडीला धक्का; राहुल, सोनिया गांधी यांना दिलासा
Daily Top 2Weekly Top 5

हरयाणा निवडणुकीबाबत काँग्रेसचे आरोप फेटाळले, निवडणूक आयोगाने १६०० पानांचं दिलं उत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 29, 2024 19:45 IST

काँग्रेसने हरयाणा निवडणुकीनंतर निवडणूक आयोगाकडे तक्रार दिली होती. या तक्रारीवर आज आयोगाने उत्तर दिले आहे.

मागील महिन्यात हरयाणा निवडणुकीचे निकाल समोर आले. या निकालानंतर काँग्रेसने निवडणूक आयोगाकडे तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवर निवडणूक आयोगाने मंगळवारी उत्तर दिले. एक निवेदन जारी करून काँग्रेस आणि इतर राजकीय पक्षांना मतदान आणि मतमोजणीच्या दिवसांसारख्या संवेदनशील वेळी निराधार आणि खळबळजनक तक्रारीबाबत आवाहन केले.

बेजबाबदार आरोपांमुळे जनतेमध्ये अशांतता आणि अराजकता निर्माण होऊ शकते, असे आयोगाने म्हटले आहे. निवडणूक आयोगाने काँग्रेसला निवडणुकीनंतर बिनबुडाचे आरोप करणे टाळण्याचे आवाहन केले. आयोगाने काँग्रेसला  ठोस पावले उचलण्याचे आणि अशा तक्रारींच्या प्रवृत्तीला आळा घालण्याचे आवाहन केले.

PM मोदींची कोट्यवधी वृद्धांना दिवाळी भेट; दरवर्षी 5 लाखांपर्यंतचे मोफत उपचार मिळणार...

आयोगाने म्हटले आहे की, हरयाणातील निवडणूक प्रक्रियेचा प्रत्येक टप्पा निर्दोष होता आणि तो काँग्रेस उमेदवार किंवा एजंटांच्या देखरेखीखाली पार पडला. २६ विधानसभा मतदारसंघातील निवडणूक अधिकाऱ्यांनी सखोल फेरपडताळणी केली. सर्व तक्रारींवर निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांकडून काँग्रेसला १६०० पानांचे उत्तर दिले आहे.

हरयाणाच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनीही विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या तक्रारी फेटाळून लावल्या. हरयाणा निवडणुकीच्या मतमोजणीच्या वेळी ईव्हीएममध्ये ९९ टक्के बॅटरीची स्थिती दिसून आल्याची भीती काँग्रेसने व्यक्त केल्यानंतर, मशिन्समध्ये संभाव्य छेडछाड झाल्याची तक्रार आणि अधिकाऱ्यांवर मतमोजणीला जाणूनबुजून उशीर केल्याचा होता.

हरयाणा विधानसभा निवडणुकीत भाजपने ९० पैकी ४८ जागांवर बहुमत मिळवले आहे. दहा वर्षांपासून सत्तेत असलेल्या भाजपविरोधात सत्ताविरोधी लाटेचा फायदा उठवण्यात अपयशी ठरलेल्या काँग्रेसला ३७ जागांवर विजय मिळवता आला आहे. याशिवाय INLD ने २ जागा जिंकल्या आहेत. याशिवाय अपक्ष उमेदवारही विजयी झाले आहेत.  त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केला आहे.

टॅग्स :congressकाँग्रेसElection Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोग