शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

राज्यसभेच्या १४ जागा रिक्त, पोटनिवडणूक एकाच जागेवर

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2021 05:47 IST

आयोगाच्या निर्णयामुळे आश्चर्य: महाराष्ट्रासह अनेक राज्यांना प्रतीक्षा

हरीश गुप्ता

लोकमत न्यूज नेटवर्क 

नवी दिल्ली : राज्यसभेच्या सद्य:स्थितीत १४ जागा रिक्त आहेत. मात्र, निवडणूक आयोगाने केवळ एकाच जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर केल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. आयोगाच्या निर्णयामुळे महाराष्ट्र आणि तामिळनाडूसह इतर काही राज्यांना प्रतीक्षा करावी लागणार आहे. पश्चिम बंगालमध्ये दिनेश त्रिवेदी यांनी तृणमूल काँग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करण्यापूर्वी राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या रिक्त जागेसाठी आयोगाने पोटनिवडणूक जाहीर केली आहे. मात्र, त्याच कालावधीत पश्चिम बंगालमध्येच तृणमूलचे मानस भुनिया यांनी आमदार झाल्यानंतर राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. त्यांच्या राजीनाम्यामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक जाहीर झालेली नाही. त्यामुळे एकाच राज्यात असा निर्णय घेण्यामागील कारण स्पष्ट झालेले नाही. 

जम्मू आणि काश्मीरमध्ये सध्या विधानसभा अस्तित्वात नसल्यामुळे चार जागांसाठी निवडणूक घेणे सध्या शक्य नाही, तसेच बिहारमध्ये शरद यादव यांच्या रिक्त जागेसाठी न्यायालयाच्या निर्णयामुळे पोटनिवडणुकीला स्थगिती आहे, तर थावरचंद गेहलोत यांनी ७ जुलैला राजीनामा दिल्यामुळे लगेच पोटनिवडणूक हाेण्याची शक्यता नाही.

सातव यांच्या जागेबाबतही निर्णय नाही

महाराष्ट्रात काँग्रेसचे दिवंगत राज्यसभा सदस्य राजीव सातव यांच्या रिक्त जागेसाठीही पोटनिवडणूक होणे अपेक्षित आहे. मात्र, त्याबाबतही निर्णय घेण्यात आलेला नाही. सातव यांचे दोन महिन्यांपूर्वी निधन झाले. आसाममध्ये बिस्वजित डायमेरी हे आमदार झाल्यानंतर रिक्त झालेल्या जागेसाठी पोटनिवडणूक अपेक्षित आहे, तसेच केरळमध्ये जानेवारी महिन्यात जोस मनी यांनी राजीनामा दिल्यानंतरही पोटनिवडणूक झालेली नाही, तसेच तामिळनाडूतील तीन जागांसाठीही पोटनिवडणूक रोखून धरण्यात आलेली आहे. आयोगाच्या या निर्णयामुळे सर्वच राजकीय पक्ष आश्चर्यचकित झाले आहेत.

यामुळे वाढली चिंता

- राज्यसभा सचिवालयाने या सर्व जागा रिक्त असल्याचे जाहीर केले आहे.

- पोटनिवडणूक घेण्याचा निर्णय निवडणूक आयोगाचा आहे. मात्र, ७ जागांसाठी निवडणूक लांबविल्यामुळे राज्यांचीही चिंता वाढली आहे. 

- निवडणूक न झाल्यास संबंधित राज्यांचे राज्यसभेत प्रतिनिधित्व होत नाही. 

टॅग्स :Election Commission of Indiaभारतीय निवडणूक आयोगRajya Sabhaराज्यसभा