शहरं
Join us  
Trending Stories
1
नाद खुळा! जसप्रीत बुमराहचा भन्नाट चेंडू, सुनील नरीन बेल्स उडताना पाहत बसला, Video
2
भाजपने पवारांचं घर फोडलं?; फडणवीसांनी सांगितलं अजितदादांच्या बंडामागचं 'लॉजिक'
3
रिषभ पंतवर सामन्याची बंदी, दिल्ली कॅपिटल्सने जाहीर केला नवा कर्णधार; RCB ला टक्कर देणार
4
औरंगाबादमध्ये प्रचारात जोरच दिसला नाही! आता मतदारांना घराबाहेर काढण्याचं आव्हाण; कोण होणार यशस्वी? 
5
कुवेतमध्ये राजकीय भूकंप! अमीर शेख यांनी संसद केली बरखास्त, घटनेच्या काही कलमांनाही स्थगिती 
6
Amit Shah : "मोदी देशाचं नेतृत्व करत राहतील यात कन्फ्यूजन नाही"; अमित शाह यांचा केजरीवालांवर पलटवार
7
मुंबई इंडियन्स-कोलकाता नाईट रायडर्स सामना रद्द होण्याची शक्यता! महत्त्वाचे अपडेट्स 
8
इशान, श्रेयस यांना BCCI करारातून कोणी वगळले? वाचा जय शाह यांनी कोणाकडे बोट दाखवले
9
‘खरोखरच काही झालं होतं की नाही देवास ठाऊक’, रेवंत रेड्डी यांनी एअर स्ट्राईकवर उपस्थित केलं प्रश्नचिन्ह   
10
करीना कपूर अडकली कायद्याच्या कचाट्यात, प्रेग्नंसीसंदर्भातील पुस्तकावर 'बायबल'चा उल्लेख
11
Jay Shah यांचा मोठा निर्णय! आता सामन्याआधी टॉस नाही होणार, पाहुणा संघ निर्णय घेणार 
12
Arvind Kejriwal : "मी 140 कोटी लोकांकडे भीक मागायला आलोय, माझा देश वाचवा"; अरविंद केजरीवाल कडाडले
13
धोनीला नक्की काय झालं? सामना संपल्यानंतर पुरस्कार स्वीकारण्यासाठी न आल्याने रंगली चर्चा
14
औरंगाबादमध्ये मतविभाजनाने फिरवला होता निकाल; यावेळचं 'गणित' वेगळं, कोण बाजी मारणार? 
15
२७ वर्षांनंतर सिनेइंडस्ट्रीला रामराम करून अध्यात्माकडे वळली अभिनेत्री, बनली साध्वी
16
एक-एक गोष्टी बदलत आहेत, हे मंदिर मी उभं केलंय...; Rohit Sharma चा व्हिडीओ KKRकडून डिलीट
17
'भाजप पुन्हा जिंकला तर उद्धव ठाकरे तुरुंगात जातील'; केजरीवालांचा गंभीर आरोप
18
Patel Engineering Ltd: वर्षभरात पैसे दुप्पट, ३ वर्षांपासून शेअर देतोय जबरदस्त रिटर्न; एक्सपर्ट बुलिश, म्हणाले...
19
EPFO: तुमचा मोबाइल नंबर बदलला असेल तर घरबसल्या कसा कराल अपडेट? पाहा प्रोसेस
20
'आता KKRला सोडून जाऊ नको' म्हणत चाहत्याला फुटलं रडू, प्रेम पाहून गौतम गंभीरही झाला नि:शब्द (video)

UP Election : उत्तर प्रदेशात भाजपला मोठा धक्का, सलग 3 ऱ्या दिवशी तिसऱ्या मंत्र्याचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: January 13, 2022 3:39 PM

उत्तर प्रदेशचे पर्यावरणमंत्री दारासिंह चौहान यांनी गुरुवारी राज्यपालांकडे आपला राजीनामा दिला. राज्यातील दलित, वंचित आणि मागासवर्ग, शेतकरी आणि बेरोजगारी संदर्भातील सरकारने उपेक्षा केली आहे

लखनौ - उत्तर प्रदेशमध्ये निवडणुकांची घोषणा होताच भाजपला एकामागोमाग एक धक्के बसत आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपाला मंगळवारी जबर धक्का बसला. योगी सरकारमधील बलाढ्य मंत्री स्वामी प्रसाद मौर्य यांनी पदासोबत भाजपाचा तडकाफडकी राजीनामा दिला. त्यानंतर, युपीतील आणखी एका मंत्र्याने राजीनामा दिला असून आता सलग तिसऱ्या दिवशी तिसऱ्या मंत्र्याने राजीनामा दिल्याने भाजपच्या गोटात खळबळ उडाली आहे. 

उत्तर प्रदेशचे पर्यावरणमंत्री दारासिंह चौहान यांनी गुरुवारी राज्यपालांकडे आपला राजीनामा दिला. राज्यातील दलित, वंचित आणि मागासवर्ग, शेतकरी आणि बेरोजगारी संदर्भातील सरकारने उपेक्षा केली आहे. तसेच, मागास आणि ओबीसी प्रवर्गाकडे सरकारने अक्षम्य दुर्लक्ष केल्याचं दिसून आलेय. त्यामुळे, मी आपल्या मंत्रीपदाचा राजीनामा देतोय, असे दारासिंह यांनी आपल्या राजीनामा पत्रात म्हटले होते. आता, युपीचे आयुष आणि आरोग्य राज्यमंत्री डॉ. धर्मसिंह सैनी यांनीही राजीनामा दिला आहे. ज्या अपक्षेनं दलित, मागास, शेतकरी, बेरोजगार युवक आणि लहान-सहान व्यापारी व छोटे उद्योजक यांनी राज्यात एकत्रितपणे भाजपचे सरकार बनिण्याचं काम केलं. मात्र, या सर्वांची आणि त्यांच्या लोकप्रतिनीधींची सातत्याने उपेक्षा होत आहे, त्यामुळेच मी मंत्रीपदाचा राजीनामा देत असल्याचं सैनी यांनी म्हटलं आहे.  सैनी यांनी राज्यपालांच्या नावे आपला राजीनामा लिहिला असून गेल्या 3 दिवसांतील हा तिसरा राजीनामा आहे. त्यामुळे, भाजपमध्ये मोठं खिंडार पडल्याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे. त्यातच, शिवसेना नेते संजय राऊत यांनीही आज शेतकरी आंदोलनाचे नेते राकेश टिकैत यांची भेट घेतली आहे. तर, शरद पवार यांनीही अनेक आमदार भाजप सोडत असल्याचे म्हटले आहे. 

स्वामी प्रसाद मौर्य यांचा सपात प्रवेश 

स्वामी प्रसाद मौर्य यांनी तडकाफडकी भाजपाला रामराम ठोकल्यानंतर अखिलेश यादव यांची भेट घेच समाजवादी पक्षात प्रवेश केला. त्यानंतर या पक्षप्रवेशाची अखिलेश यादव यांनी ट्विट करत माहिती दिली. त्यात अखिलेश यादव म्हणाले की सामाजिक न्याय आणि समता-समानतेची लढाई लढणारे लोकप्रिय नेते स्वामी प्रसाद मौर्य आणि त्यांच्यासोबत आलेल्या अन्य सर्व नेत्यांचे आणि कार्यकर्त्यांचे समाजवादी पक्षामध्ये स्वागत आहे. उत्तर प्रदेशात सामाजित न्यायामध्ये इन्कलाब होईल, २०२२ मध्ये परिवर्तन होईल. दरम्यान स्वामी प्रसाद मौर्य यांनी २०१७ मध्ये भाजपामध्ये प्रवेश केला होता. ते पडरौना मतदारसंघातून निवडून आले होते. ते या मतदारसंघातून सलग तीन वेळा निवडून आले होते. 

 

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथUttar Pradeshउत्तर प्रदेशministerमंत्रीElectionनिवडणूक