शहरं
Join us  
Trending Stories
1
एनआयए ऑन द स्पॉट : हल्ल्याचे धागेदोरे तपासणे सुरू, फॉरेन्सिक टीमही घटनास्थळी
2
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२५: नोकरीत पदोन्नती अन् व्यापारात व उत्पन्नात वाढ होईल
3
दहा वर्षांत १७ कोटी भारतीयांची गरिबी हटविण्यात यश, नोकऱ्यांमध्येही वाढ; वर्ल्ड बँकेचा अहवाल
4
वर्दीचा सन्मान राखा; एकनाथ शिंदे यांची आमदार गायकवाड यांना भर सभेत समज!
5
हल्ल्याची छायाचित्रे पाहून भारतीयांचे रक्त उसळते आहे; दहशतवाद्यांना होईल शिक्षा, पीडितांना न्याय मिळेल : मोदी
6
संघर्ष, सीमेच्या ‘आतला’... अंतर्गत संघर्षाचा मुद्दा देशासाठी तेवढाच गंभीर
7
धक्कादायक! लेकीचा प्रेमविवाह, बापाचा गोळीबार, लेक जागीच ठार
8
उल्हासनगर शहरात अजूनही १७ सिंधी पाकिस्तानी नागरिक; आज देश सोडून मायदेशात जाणार
9
बडतर्फ पीएसआय कासलेला हर्सूलला हलविले; कराड अन् कासले एकाच कोठडीत होते
10
सुगंध येण्यासाठी तांदळाला लावत होते केमिकल; एफडीएने दाेन दिवसानंतर दिली कारवाईची माहिती
11
सीईटीच्या मॅथ्स पेपरमध्ये घोळ, निम्मे पर्याय चुकीचे; विद्यार्थ्यांचा गोंधळ, सीईटी पर्यवेक्षकांचे कानावर हात
12
भारत-पाक सीमेवरील पीक काढणी दोन दिवसांत पूर्ण करा, सीमा सुरक्षा दलाचे सीमाभागातील शेतकऱ्यांना निर्देश
13
रक्त संतापाने उसळते आहे, आता बास! आम्ही भारतीय लोक पोकळ धमक्या देत नसतो
14
ईडी कार्यालयाला आग; संशयाचा धूर , मुंबई साखर झोपेत असताना दुर्घटना, कारण अस्पष्ट
15
किती अधिकाऱ्यांना मंत्रालयात सुनावणीसाठी बोलावणार?
16
अत्याचारामुळे आम्ही पाक सोडले, त्यांना धडा शिकवा; भारतीय नागरिकत्वाच्या प्रतीक्षेत असलेले ६० पाकिस्तानी कोल्हापुरात
17
एनसीईआरटीच्या पाठ्यपुस्तकांतून मुघल, दिल्ली सल्तनतचे संदर्भ हटविले
18
गणेश नाईकांचा वारू शिंदेसेना रोखेल काय?; दोघेही एकमेकांना शह देण्याची संधी सोडत नाहीत
19
एकही पाकिस्तानी महाराष्ट्रात राहणार नाही : देवेंद्र फडणवीस
20
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान

Biparjoy Cyclone : एकदा दोनदा नव्हे तर 'या' वृद्ध जोडप्याने चक्रीवादळात तीनदा गमावलं घर; बिपरजॉयवर म्हणतात...

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 16, 2023 10:34 IST

Biparjoy Cyclone : चक्रीवादळामुळे एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तीनदा आपलं घर उद्ध्वस्त होताना पाहिलं आहे. 

चक्रीवादळ बिपरजॉयची लँडफॉल प्रक्रिया सुरू झाली आहे. गुजरातच्या किनारपट्टीवर सुमारे 125 किमी प्रति तास वेगाने जोरदार वारे आणि मुसळधार पाऊस सुरू झाला आहे. गुजरातच्या ज्या भागात हे चक्रीवादळ सागरी किनार्‍यावर धडकत आहे, तिथे एक वृद्ध जोडपं राहतं ज्यांनी चक्रीवादळामुळे एकदा नव्हे, दोनदा नव्हे तर तीनदा आपलं घर उद्ध्वस्त होताना पाहिलं आहे. 

गुजरातमधील जाखाऊ येथील एका जोडप्याने अनेक वेळा त्यांचं घर पुन्हा बांधलं आहे. हवाबाई आणि उस्मान, दोघेही 70 वर्षांचे आहेत. ते सध्या जखाऊ जवळील निवारागृहात आहेत ज्यांना किनार्‍याजवळच्या भागातून बाहेर काढण्यात आले आहे. उस्मान म्हणाले, "आमच्याकडे पक्कं घर नसल्यामुळे, आम्ही यापूर्वी चक्रीवादळात आमचं घर कोसळताना आणि उडताना पाहिलं आहे."

या दाम्पत्याचा उदरनिर्वाह शेतीतून होतो. त्यांनी सांगितले की, प्रत्येक वेळी त्यांच्या कमाईने आणि मुलांच्या मदतीने त्यांनी घर पुन्हा बांधलं. मात्र, अतिवृष्टीचा परिणाम आपल्या पिकांवर झाल्याची खंत त्यांनी व्यक्त केली. आज पुन्हा घर कोसळण्याच्या शक्यतेबद्दल त्यांना काळजी वाटते का, असं विचारलं असता, या जोडप्याने सांगितलं की, ते मजूर म्हणून काम करतील आणि घर पुन्हा बांधण्यासाठी पैसे गोळा करतील.

भूतकाळात दिसलेल्या तीन चक्रीवादळांपेक्षा बिपरजॉय हे भयंकर होईल अशी भीती वाटत आहे का, असे विचारलं. तर त्यावर त्यांनी आपण घाबरत नसल्याचं सांगितलं. उस्मान म्हणाले, "चक्रीवादळाचा आपल्यावर फारसा परिणाम होणार नाही. हेही निघून जाईल. आम्ही भाग्यवान आहोत की लोकांनी आपली घरे गमावली असली तरी, यापूर्वी या प्रदेशात कोणतीही जीवितहानी झालेली नाही."

बिपरजॉय चक्रीवादळ हे जोडपे राहत असलेल्या जखाऊ जवळच्या भागात किनारपट्टीवर धडकणार आहे. कच्छ, जामनगर, मोरबी, राजकोट, देवभूमी द्वारका, जुनागढ, पोरबंदर आणि गीर सोमनाथ या आठ किनारी जिल्ह्यांमध्ये आतापर्यंत सुमारे एक लाख लोकांना तात्पुरत्या आश्रयस्थानी नेण्यात आल्याचं सरकारने म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

टॅग्स :cycloneचक्रीवादळGujaratगुजरात