शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध जोडप्यानं 44 वर्षांनंतर घेतला घटस्फोट, पतीनं ₹3 कोटीला जमीन विकून केली तडजोड; पण ठेवली एक अट

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 17, 2024 12:03 IST

यासंदर्भात  बोलातना 70 वर्षीय पतीने म्हटले आहे की, आपली 73 वर्षीय पत्नी मानसिक छळ करते आणि आपण याला कंटाळलो आहोत.

बेंगळुरूतील अभियंता अतुल सुभाष यांनी पत्नीसोबतचे संबंध बिघडल्यानंतर आत्महत्या केल्याची घटना ताजी असतानाच, आता  हरियाणातून घटस्फोटाचे एक अनोखे प्रकरण समोर आले आहे. येथील कर्नाल जिल्ह्यातील एका जोडप्याने आपले 44 वर्षांचे वैवाहिक जीवन संपुष्टात आनले आहे. यात पतीने 73 वर्षीय महिलेला 3 कोटी रुपये दिले आहेत. 18 वर्षांच्या कायदेशीर लढाईनंतर या वृद्ध जोडप्याने हा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात  बोलातना 70 वर्षीय पतीने म्हटले आहे की, आपली 73 वर्षीय पत्नी मानसिक छळ करते आणि आपण याला कंटाळलो आहोत.

सेटलमेंटची रक्कम चुकवण्यासाठी पतीनं शेत विकलं - ही तडजोड करण्यासाठी पतिला आपली शेतजमीन विकावी लागली आहे. यानंतर पतिने संबंधित महिलेला 3 कोटी रुपये दिले. यानंतर पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने दोघांच्या घटस्फोटाला मंजुरी दिली. 27 ऑगस्ट 1980 रोजी या दोघांचे लग्न झाले होते. त्यांना दोन मुली आणि एक मुलगा आहे. सुमारे 25 वर्षे हे नाते अत्यंत चांगल्या प्रकारे  टिकले. मात्र नंतर या जोडप्यात कटुता निर्माण होऊ लागली. ते जोडपे 8 मे 2006 पासून वेगळे राहत होते. यानंतर पतीने 2013 मध्ये मानसिक छळाचा आरोप करत घटस्फोटाची केस दाखल केली. मात्र, त्यांचा अर्ज फेटाळला गेला. यानंतर पती उच्च न्यायालयात पोहोचला.

उच्च न्यायालयात 11 वर्षे खटला चालल्यानंतर, पतीने पत्नीच्या उदरनिर्वाहासाठी 3 कोटी रुपये दिले आणि त्याना घटस्फोट मिळाला. या तडजोडीची रक्कम रोख, डिमांड ड्राफ्ट, सोने आणि चांदीच्या स्वरुपात दिली जाणार आहे. आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार, ही रक्कम फेडण्यासाठी वृद्धाने 2.16 कोटी रुपयांची जमीन विकली आहे. 

याशिवाय, वृद्धाने 50 लाख रुपये रोख स्वरुपात दिले आहेत. हे पैसे पीक विकून जमवण्यात आले होते. तसेच, ते 40 लाखांचे दागिनेही देत ​​आहे. महत्वाचे म्हणजे, संबंधित वृद्ध व्यक्तीचा मृत्यू झाला तरीही पत्नी आणि तिच्या मुलांचा मालमत्तेवर कोणताही हक्क राहणार नाही, असेही या करारात म्हणण्यात आले आहे. उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सुधीर सिंग आणि न्यायमूर्ती जसजित सिंग बेदी यांनी हा निर्णय दिला.

टॅग्स :Divorceघटस्फोटHaryanaहरयाणाHigh Courtउच्च न्यायालयhusband and wifeपती- जोडीदार