शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
4
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
5
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
6
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
7
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
8
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
9
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
10
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
11
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
12
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
13
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
14
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
15
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
16
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
17
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
18
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
19
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
20
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

अतूट नातं! छोट्या भावाचा मृतदेह पाहून मोठ्या भावानेही घेतला अखेरचा श्वास; झालं असं काही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 13, 2023 16:26 IST

हृदयविकाराच्या झटक्याने लहान भावाचा मृत्यू झाल्यानंतर मोठ्या भावाला हे दु:ख सहन झालं नाही.  

भावा-भावाचं नातं अतूट असतं. जर भावाला दुसऱ्या भावाविषयी खरंच खूप जास्त प्रेम अन् ओढ असेल तर तो त्याच्याशिवाय राहू शकत नाही. असाच काहीसा हृदयस्पर्शी प्रकार राजस्थानमधील शेखावाटी भागातील सीकर जिल्ह्यात घडला आहे. येथे हृदयविकाराच्या झटक्याने लहान भावाचा मृत्यू झाल्यानंतर मोठ्या भावाला हे दु:ख सहन झालं नाही.  त्यांनीही काही वेळाने जगाचा निरोप घेतला. 

लहान भावाचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला, तर मोठ्या भावालाही नंतर हृदयविकाराचाच झटका आला. एकाच कुटुंबातील दोन भावांच्या मृत्यूमुळे त्यांच्या कुटुंबात शोककळा पसरली होती. मिळालेल्या माहितीनुसार, सीकर जिल्ह्यातील रामगड शेखावाटी शहरात ही घटना घडली आहे. रामगड वॉर्ड क्र. शहरातील काझी नियाज अहमद (65) हे नटवरजी मंदिर परिसरात 13 येथे राहत होते. नियाज अहमद यांचे शनिवारी सायंकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. 

नियाज यांचे मोठे भाऊ जमील अहमद (70) यांना याची माहिती मिळताच त्यांनी तात्काळ धाकट्या भावाचे घर गाठले. तेथे लहान भावाचा मृतदेह पाहून ते रडू लागले आणि त्यांची प्रकृती खालावली. त्यांना तेथून औषधी वगैरे देण्यासाठी घरी नेण्यात आलं. जमील अहमद घरी पोहोचताच त्यांनी बोलणे बंद केल्याचं सांगितलं जातं. याच दरम्यान, त्यांना हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांनीही जगाचा निरोप घेतला. 

नियाज अहमद यांच्यानंतर मोठा भाऊ जमील अहमद यांच्या मृत्यूने कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. जमील अहमद यांचा मुलगा दुबईत मजुरीचे काम करतो. नातेवाईक त्याची वाट पाहत आहेत. एकाच कुटुंबातील दोन भावांच्या मृत्यूमुळे शहरात शोककळा पसरली आहे. लोकांनी दोन्ही भावांचे एकमेकांवर खूप प्रेम होते. काम मोठं असो की छोटं, दोन्ही भाऊ एकत्र  करत होते, राहत होते आणि आता एकत्र जग सोडून गेले असं म्हटलं आहे.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"