शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
2
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
5
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
6
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
7
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
8
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
9
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
10
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
11
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
12
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
13
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
14
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
15
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
16
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
17
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
18
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
19
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
20
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
Daily Top 2Weekly Top 5

Eknath Shinde: "४० आमदारांचा पाठिंबा, माझ्याकडचा गट हीच खरी शिवसेना", एकनाथ शिंदेंचा मोठा दावा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 22, 2022 07:45 IST

Eknath Shinde: आपल्याकडे ४० आमदारांचा पाठिंबा आहे. तसेच माझ्याकडा गट हीच खरी शिवसेना आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. 

गुवाहाटी - एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील सत्ताधारी असलेल्या महाविकास आघाडी सरकारला जबरदस्त हादरा बसला आहे. एकीकडे एकनाथ शिंदे यांना शिवसेना गटनेते पदावरून हटवून सेना नेतृत्वाने डॅमेज कंट्रोल करण्याचा प्रयत्न केला होता. मात्र गुजरातमधील सूरत येथून आसाममधील गुवाहाटी येथे पोहोचलेल्या एकनाथ शिंदे यांनी सकाळी सकाळी शिवसेनेमध्ये भूकंप घडवणारा दावा केला आहे. आपल्याकडे ४० आमदारांचा पाठिंबा आहे. तसेच माझ्याकडा गट हीच खरी शिवसेना आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे. आसाममधील गुवाहाटी विमानतळावर उतरल्यानंतर प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना एकनाथ शिंदे म्हणाले की, आम्ही बाळासाहेबांचं हिंदुत्व पुढे घेऊन जाणार आहोत. आमच्यासोबत ४० आमदार आहेत. तसेच आणखी १० आमदारांचा आम्हाला पाठिंबा मिळणार आहे, असा दावा एकनाथ शिंदे यांनी सांगितले. तसेच आपल्याकडे शिवसेनेचे दोन तृतियांश आमदार असून, आमचा गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा एकनाथ शिंदे यांनी केला आहे.

दरम्यान, आज दुपारी एकनाथ शिंदे हे विशेष विमानाने मुंबईत येणार असून, ते राज्यपालांची भेट घेण्याची शक्यता आहे. तसेच राज्यपालांकडे ते आपला गट हीच खरी शिवसेना असल्याचा दावा ते करतील, असा दावा करण्यात येत आहे. 

हिंदुत्वाचा मुद्दा पुढे करत उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणारे एकनाथ शिंदे आणि त्यांच्यासोबतचे इतर शिवसेना आमदार गुवाहाटी येथे दाखल झाले आहेत. पहाटे तीनच्या सुमारास गुजरातमधील सूरत येथून निघालेले हे आमदार सकाळी सातच्या सुमारास गुवाहाटी येथे पोहोचले. त्यांना नेण्यासाठी आसाम स्टेट ट्रान्सपोर्टच्या बस सज्ज ठेवण्यात आल्या होत्या. त्यामधून ते गुवाहाटीमधील एका हॉटेलमध्ये दाखल झाले आहेत. 

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेShiv Senaशिवसेना