शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

"तुम्ही वर्षा सोडलं, मंत्रालयात जात नाही, मातोश्रीत कोणाला एन्ट्री नाही मग राज्य कोण चालवतंय?"

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 27, 2022 13:00 IST

Ashish Jaiswal And Uddhav Thackeray : शिंदे गटात असलेले अपक्ष आमदार आशिष जयस्वाल यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 

नवी दिल्ली - उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारविरोधात बंड पुकारणाऱ्या बंडखोर आमदारांनी  ठाकरे आपण ठाकरे सरकारचा पाठिंबा काढल्याचा दावा केला आहे. सुप्रीम कोर्टात दाखल केलेल्या याचिकेमधून बंडखोर शिंदे गटाने हा दावा केला आहे. आमच्याकडे दोन तृतियांश आमदारांचा पाठिंबा आहे. ३८ आमदारांनी ठाकरे सरकारचा पाठिंबा काढून घेतला आहे. त्यामुळे हे सरकार अल्पमतात असल्याचा दावा बंडखोर शिंदे गटाने याचिकेत म्हटले आहे. याच दरम्यान शिंदे गटात असलेले अपक्ष आमदार आशिष जयस्वाल (Ashish Jaiswal) यांनी ठाकरे सरकारवर निशाणा साधला आहे. 

गुवाहाटीमध्ये असलेल्या आशिष जयस्वाल (Uddhav Thackeray) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना काही सवाल केले आहेत. "तुम्ही वर्षा सोडलं, तुम्ही मंत्रालयात जात नाही आणि मातोश्रीत कोणाला एन्ट्री नाही. मग राज्य कोण चालवतंय?" असं म्हटलं आहे. एबीपी माझाशी संवाद साधताना त्यांनी हा सवाल केला आहे. आशिष जयस्वाल यांच्या विरोधात रामटेकला निषेध सभा घेण्यात येणार आहे. यावर जयस्वाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. मी तुमच्या पक्षात आहे का की तुम्ही माझा निषेध कराल? मी अपक्ष आहे, मला संविधानाने अधिकार दिला आहे की मी कुठेही जाऊ शकतो. मी 2019 ला बंडखोर होतो, आज नाही. तेव्हा माझ्या निषेध सभा घ्यायच्या होत्या, तेव्हा घेतल्या का? तेव्हा तर तुम्ही भाजप-शिवसेनेसाठी घेतल्या. आज काय निषेध करता, असं म्हटलं आहे. 

आशिष जयस्वाल यांनी काही महिन्यांपूर्वी नाराजीचा सूर आवळला होता. मंत्र्यांकडून निधी वाटपात भेदभाव होत आहे. आमदारांच्या मतदारसंघात दुसऱ्यांच्या शिफारसीवर निधी दिला जात आहे, असे सांगत निधी वाटपात मंत्र्यांची दादागिरी सहन करणार नाही, असा इशारा त्यांनी दिला होता. ही काही माझी एकट्याची तक्रार नसून बहुतांश आमदारांची तक्रार आहे. काँग्रेसच्या आमदारांनीही तक्रारींवर सही केली आहे. सर्व आमदारांना सारखा न्याय मिळाला पाहिजे. काहींना झुकते माप व काहींवर अन्याय हे होऊ देणार नाही. सर्व आमदारांच्या भरवशावर विधानसभेत अर्थसंकल्प सादर केला जातो. त्या आमदारांना नियमानुसार निधी देणे आवश्यक आहे असं म्हटलं होतं. 

मंत्र्यांकडून असमान निधी वाटपात काही आर्थिक व्यवहार तर झाला नाही ना, अशी शंकाही आशिष जयस्वाल यांनी उपस्थित केली होती. कुठल्याही आर्थिक व्यवहारातून निधी वितरित करण्यात आला असेल तर ते आम्हाला मान्य नाही, अशा सर्व मंत्र्यांची पोलखोल करू, असा इशाराही त्यांनी दिला होता. जयस्वाल यांचे हे आरोप गंभीर असून यामुळे महाविकास आघाडीतील मंत्री आर्थिक व्यवहारातून निधी वितरित करतात का, असा प्रश्न निर्माण झाला होता.  

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेAshish Jaiswalआशीष जयस्वालUddhav Thackerayउद्धव ठाकरेShiv Senaशिवसेना