शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
3
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
4
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
5
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
6
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
9
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
10
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
11
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
12
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
13
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
14
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
15
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
16
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
17
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
18
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
19
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
20
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
Daily Top 2Weekly Top 5

"एकतर आंबेडकर फेल झाले अथवा आंबेडकरवादी"; शंकराचार्यांनी आरक्षणावर उपस्थित केला सवाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 24, 2024 14:30 IST

"आंबेडकरांना हे अपेक्षित नव्हते की, पुढील दोनशे वर्षे, हजार वर्षे लोकांनी आरक्षणाचा उपभोग घेत रहावा. आरक्षणाच्या माध्यमाने समाजाने मुख्य प्रवाहात यावे, अशी त्यांची अपेक्षा होती."

ज्योतिषी पीठाधीश्वर जगद्गुरू शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती (shankaracharya avimukteshwaranand saraswati) यांनी जातीय आरक्षणासंदर्भात मोठे विधान केले आहे. ते म्हणाले, "आरक्षण व्यवस्था ही केवळ 10 वर्षांसाठी होती. लोकांनी आयुष्यभर आरक्षणाच्या कुबड्या घेऊन चालावे असे कधी बाबासाहेबांनाही वाटले नाही. मात्र त्याची अंमलबजावणी होऊन 78 वर्षे उलटली, तरीही ज्या वर्गासाठी ही व्यवस्था निर्माण करण्यात आली, तो वर्ग मुख्य प्रवाहात सामील होऊ शकलेला नाही. याचा अर्थ एकतर आंबेडकर फेल झाले अथवा आंबेडकरवादी फेल झाले." एवढेच नाही तर, "लोकांनी यामध्ये न जाता शिक्षण, आरोग्य आदींशी संबंधित आपल्या समस्या मांडायला हव्यात, असेही ते म्हणाले.

शंकराचार्य स्वामी अविमुक्तेश्वरानंद सरस्वती सोमवारी काशी येथे आले होते. येथे केदारघाट येथील श्रीविद्यामठ येथे डॉ. हरिप्रकाश पांडे यांच्या हस्ते सपत्नीक पादुका पूजन करण्यात आले. दरम्यान, प्रसारमाध्यमांशी बोलताना एका प्रश्नाला उत्तर देताना शंकराचार्यांनी वरील भाष्य केल्याचे बोलले जात आहे. 

ते म्हणाले, "78 वर्षे झाली. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानासंदर्भआत बोलले जात आहे. जे लोक आंबेडकरांच्या मागे होते, त्यांनी 78 वर्षांत किती प्रगती साधली. 10 वर्षे आरक्षण दिले होते, 78 वर्षे झाली हे आरक्षण सुरूच आहे आणि ते रद्द होऊ नये यासाठी त्यांचे लोक लढत आहे. आपण आयुष्यभर पंगू होऊन आरक्षणाच्या कुबड्यांवर उभे रहावे, यासाठी आरक्षण दिले नव्हते."

ते पुढे म्हणाले, "आपण समाजाच्या मुख्य प्रवाहात यावे, यासाठी आंबेडकर साहेबांनी आरक्षण दिले होते. आपण कुठे येऊ शकलात? जे लोक आंबेडकरांचे नाव घेतात, मला त्यांनाच विचारायचे आहे की, त्यांनी आंबेडकरांच्या भावनेचे किती काळजी घेतली? आंबेडकरांना हे अपेक्षित नव्हते की, पुढील दोनशे वर्षे, हजार वर्षे लोकांनी आरक्षणाचा उपभोग घेत रहावा. आरक्षणाच्या माध्यमाने समाजाने मुख्य प्रवाहात यावे, अशी त्यांची अपेक्षा होती. आपण 78 वर्षापासून मुख्य प्रवाहात सामील होऊ शकला नाहीत. याचा अर्थ एकतर आंबेडकर फेल झाले अथवा आंबेडकरवादी फेल झाले."

शंकराचार्य पुढे म्हणाले, "आमचे म्हणणे आहे की, या भानगडीत जाऊ नका. आपल्याला ज्या काही समस्या असतील, आपल्याला शिक्षण मिळत नाही, शिक्षणाची मागणी करता. आपल्याला आरोग्य सुविधा मिळत नाहीत, आरोग्याची मागणी करा. आपल्याला मुख्य प्रवाहात आणले जात नाही, कुठेतरी आपला अपमान होतोय, असे मुद्दे उचला की, जर समाज एक आहे, तर मग भेदभाव व्हायला नको. हे ठीक आहे, पण आंबेडकरांचा कुणी मान केला, कुणी अपमान केला, आपण याचाच ढोल वाजवत बसा आणि राजकारण्यांना जे कारायचे आहे,  ते करत आहेत."

टॅग्स :reservationआरक्षणDr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकर