शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
6
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
7
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
8
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
9
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
10
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
11
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
12
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
13
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
14
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
15
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
16
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
17
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
18
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
19
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

योगी यांच्या मंत्रिमंडळातील ८५ % मंत्री किमान पदवीधर, ५२ मंत्री पीएचडी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 27, 2022 05:49 IST

५२ मंत्री पीएचडी, २ डॉक्टर, १ इंजिनीअर, ६ वकील, २२ पोस्ट ग्रॅज्युएट, ११ ग्रॅज्युएट

शरद गुप्ता 

नवी दिल्ली : उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ यांच्या मंत्रिमंडळातील ८५ टक्के मंत्री पदवीधर किंवा पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत. यात विद्यापीठातील शिक्षक, माजी आयएएस-आयपीएस, उच्च न्यायालय व सर्वोच्च न्यायालयाचे वकील यांचा समावेश आहे. योगी मंत्रिमळात स्वत: मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री केशवप्रसाद मौर्य यांच्यासह ११ मंत्री पदवीधर आहेत. पंतप्रधान मोदी यांचे सचिव राहिलेले जितीन प्रसाद आणि उत्तराखंडच्या माजी राज्यपाल बेबी राणी मौर्य यांच्यासह २२ जण पोस्ट ग्रॅज्युएट आहेत. ९ प्रोफेशनल आणि  ३ पीएचडी आहेत. 

मंत्रिमंडळातील बरेलीचे आमदार डॉ. अरुण कुमार हे एमबीबीएस आहेत. हाथरसचे धर्मवीर प्रजापती आयुर्वेदाचे डॉक्टर आहेत. शाहजहानपूरचे जेपीएस राठौड इंजिनिअर आहेत. उपमुख्यमंत्री ब्रजेश पाठक, वरिष्ठ मंत्री सुरेश खन्ना यांच्यासह ६ मंत्री वकील आहेत. पीएचडी असलेल्या मंत्र्यांत मेरठ दक्षिणचे डॉ. सोमेंद्र सिंह तोमर, आग्राच्या  एत्मादपूरचे डॉ. धर्मपाल सिंह आणि वाराणसीचे डॉ. दयाशंकर मिश्र दयालू यांचा समावेश आहे. दयालू हे एका कॉलेजात  प्रिन्सिपलही आहेत. 

१५ टक्के मंत्री नाहीत पदवीधरयोगी यांच्या मंत्रिमंडळातील १५ टक्के मंत्री हे केवळ बारावी अथवा त्यापेक्षाही कमी शिकलेले आहेत. यात तीन जण बारावी पास आहेत. दोन जण दहावी पास, तर दोनजण केवळ आठवी पास आहेत. मेहरौनीचे आमदार मनोहर लाल, अलाहाबाद दक्षिणचे आमदार नंद गोपाल गुप्ता नंदी आणि भूपेंद्र सिंह चौधरी हे बारावी पास आहेत. बागपतमधील बडोतचे आमदार कृष्णपाल मलिक आणि आग्राच्या खैरचे आमदार अनूप वाल्मिकी हे दहावी पास आहेत.हस्तिनापूरमधून जिंकलेले दिनेश आणि सीतापूरचे  राकेश राठौड हे आठवी पास आहेत. राकेश राठौड हे तर एकेकाळी स्कूटरचे पंक्चर काढण्याचा व्यवसाय करीत असत.

माजी आयएएस अन् आयपीएसपंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे सचिव राहिलेले माजी आयएएस अधिकारी अरविंदकुमार शर्मा यांना मंत्री बनविण्यात आले आहे. कानपूरचे पोलीस आयुक्त राहिलेले आयपीएस अधिकारी असीम अरुण यांनाही मंत्रिपद मिळाले आहे.

टॅग्स :yogi adityanathयोगी आदित्यनाथMaharashtraमहाराष्ट्रministerमंत्री