सरकार आणि शेतकरी संघटनांच्या प्रतिनिधींमध्ये तीन कृषी कायद्यांवर तोडगा काढण्यासाठी शुक्रवारी बैठकीची आठवी फेरी पार पडली. या बैठकीतदेखील याप्रकरणी कोणताही तोडगा निघाला नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आता पुढील बैठक १५ जानेवारी रोजी होण्याची शक्यता आहे. या बैठकीदरम्यान शेतकऱ्यांनी कृषी कायदे मागे घेण्याबाबत ठाम भूमिका घेतली होती. तसंच ज्या वेळी सरकार कृषी कायदे मागे घेईल त्याचवेळी शेतकरी पुन्हा घरी जातील अशी भूमिकाही यावेळी घेण्यात आली. दरम्यान, सरकारनंही कृषी कायदे मागे घेण्याव्यतिरिक्त केवळ ज्या मुद्द्यांवर वाद आहेत तिथपर्यंत आपली चर्चा मर्यादित ठेवण्यास सांगितलं.सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या बैठकीत अधिक चर्चा करण्यात आली नाही. तसंच पुढील तारीख सर्वोच्च न्यायायलयात या प्रकरणी ११ जानेवारी रोजी सुनावणी पार पडणार आहे त्याचा विचार करताच ठरवण्यात आली आहे. सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार सर्चोच्च न्यायालय शेतकरी आंदोलनाशी निगडित अन्य मुद्द्यांव्यतिरिक्च तिन्ही कायद्यांच्या वैधतेवरदेखील विचार करू शकेल, असं सांगण्यात आलं.
कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम; सरकार म्हणालं, 'देशहित लक्षात ठेवा'
By जयदीप दाभोळकर | Updated: January 8, 2021 18:45 IST
सरकार आणि शेतकरी नेत्यांमध्ये आज पार पडली बैठकीची आठवी फेरी
कृषी कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम; सरकार म्हणालं, 'देशहित लक्षात ठेवा'
ठळक मुद्देशेतकरी नेते कायदे मागे घेण्यावर ठाम१५ जानेवारी रोजी होणार बैठकीची नववी फेरी