देशात साडेआठ हजार नक्षलवादी -सरकार

By admin | Published: July 31, 2014 03:36 AM2014-07-31T03:36:25+5:302014-07-31T03:36:25+5:30

देशात नक्षलवाद्यांची संख्या साडेआठ हजार असून, सशस्त्र आणि दारुगोळा खरेदी करण्यासाठी त्यांचे ईशान्येतील बंडखोर गटांशी सामरिक सामंजस्य झाले आहे, असे सरकारने म्हटले आहे

Eight thousand Naxalites in the country - the government | देशात साडेआठ हजार नक्षलवादी -सरकार

देशात साडेआठ हजार नक्षलवादी -सरकार

Next

नवी दिल्ली : देशात नक्षलवाद्यांची संख्या साडेआठ हजार असून, सशस्त्र आणि दारुगोळा खरेदी करण्यासाठी त्यांचे ईशान्येतील बंडखोर गटांशी सामरिक सामंजस्य झाले आहे, असे सरकारने म्हटले आहे.
उपलब्ध अहवालानुसार डाव्या कट्टरवाद्यांची संख्या ८,५०० च्या आसपास आहे. मात्र त्यांच्या समर्थकांची संख्या मोठी आहे, असे गृहराज्यमंत्री किरण रिजीजू यांनी राज्यसभेत एका लिखित उत्तरात सांगितले. नक्षलवादी सुरक्षा दलांवर हल्ले करण्यासाठी एलएमजी, एके-४७ इत्यादीसारखे अत्याधुनिक सशस्त्रांचा वापर करीत आहेत. सीपीआय (माओ)ने अलीकडे बसलेल्या काही जबर धक्क्यातून स्वत:ला सावरून परत हल्ले करण्याच्या दृष्टीने बळ प्राप्त केले आहे. एलडब्ल्यूई गट दरवर्षी मोठ्या प्रमाणात युवकांची भरती करतो. २०१३ मध्ये या गटांनी एलडब्ल्यूई प्रभावित राज्यातून सुमारे ४३३ कॅडरची भरती केली आहे, असेही ते म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Eight thousand Naxalites in the country - the government

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.