शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
2
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
3
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
4
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
5
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
6
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
7
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
8
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
9
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
10
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
11
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
12
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
13
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
14
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
15
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
16
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
17
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
18
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
19
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
20
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प

आठ रुग्णालयांनी नकार दिला; उपचाराअभावी गर्भवतीचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2020 04:53 IST

नोएडातील धक्कादायक घटना; प्रशासनाकडून चौकशी सुरू

नॉयडा : आठ महिन्यांची गरोदर असलेल्या व उच्च रक्तदाबामुळे श्वसनास त्रास होत असलेल्या एका ३० वर्षीय महिलेला नोएडामधील तब्बल आठ रुग्णालयांनी बेड रिकामे नसल्याचे कारण देऊन दाखल करून घेतले नाही. वेळीच उपचार न मिळाल्याने तिचा मृत्यू झाल्याचा आरोप या महिलेच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश गौतम बुद्धनगर जिल्हा प्रशासनाने दिले आहेत.

या मृत महिलेचे नाव नीलम असून ती गाझियाबाद येथील खोरा गावची रहिवासी होती. तिच्या मागे पती व पाच वर्षांचा एक मुलगा असा परिवार आहे. नीलमचा भाऊ शैलेंद्रकुमार याने सांगितले की, प्रकृती चिंताजनक बनलेल्या नीलमला रिक्षात घालून आम्ही शुक्रवारी किमान सहा रुग्णालयांत गेलो. पण सर्वच ठिकाणी तिला दाखल करून घेण्यास नकारघंटा वाजविण्यात आली. त्यानंतर नीलमला आॅक्सिजनची गरज असल्याने एका रुग्णवाहिकेत घालून आणखी दोन रुग्णालयांत नेण्यात आले. तिथेही तिला दाखल करून घेण्यात आले नाही. एकही बेड रिकामा नाही, असे कारण रुग्णालयांतून नीलमच्या नातेवाईकांना ेसांगितले. नीलमला आम्ही अगदी थोडावेळ दाखल करून घेतले. तिला व्हेंटिलेटरवर ठेवून नंतर दुसऱ्या रुग्णालयात हलविण्याचा सल्ला दिला, असे शारदा हॉस्पिटलच्या व्यवस्थापनाने स्पष्ट केले आहे.असंवेदनशीलतेचा कळसच्नीलमला सरतेशेवटी नॉयडाच्या गव्हर्मेन्ट इन्स्टिट्यूट आॅफ मेडिकल सायन्सेस (जीआयएमएस) रुग्णालयात नेले असता, तेथील डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. तिला काही रुग्णालयांनी दाखल करून घेण्यास नकार देणे हा असंवेदनशीलतेचा कळस आहे, अशी प्रतिक्रिया आता या घटनेवर उमटत आहे. नीलमवर गाझियाबादमधील शिवालिक रुग्णालयात त्याआधी पाच दिवस उपचार करण्यात आले होते. त्यानंतर तिला ४ जून रोजी घरी जाऊ देण्यात आले. शुक्रवारी तिची प्रकृती पुन्हा बिघडली होती.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याdelhiदिल्लीDeathमृत्यू