शहरं
Join us  
Trending Stories
1
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
2
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
3
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
4
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
5
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
6
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
7
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
8
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
9
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
10
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
11
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
12
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
13
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
14
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
15
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
16
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
17
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
18
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
19
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
20
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
Daily Top 2Weekly Top 5

भारत-नेपाळमध्ये आठ करार, दोन्ही देशांचे संबंध हिमालयाइतके जुने - मोदी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2017 22:45 IST

भारत आणि नेपाळमध्ये आज आठ करार झाले आहेत. नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत. 

नवी दिल्ली, दि. 24 - नेपाळचे पंतप्रधान भारताच्या दौऱ्यावर आले आहेत. उभय देशामध्ये आज बांधकाम क्षेत्र तसेच शैक्षणिक आणि इतर क्षेत्रांमध्ये सहकार्य करण्याचे विविध सामंजस्य करार करण्यात आले. भारत आणि नेपाळमध्ये आज आठ करार झाले आहेत. नेपाळचे पंतप्रधान शेर बहादूर देऊबा हे सध्या भारत दौऱ्यावर आहेत.  या करारांवर स्वाक्षऱ्या केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन्ही देशाच्या संबधावर भाष्य केलं आहे. ते म्हणाले की, नेपाळ आणि भारताचे संबंध नेहमीच दृढ राहतील. दोन्ही देशांचे संबंध हिमालयाइतके जुने असल्याचे यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

दरवर्षी पुरामुळे नेपाळला होणाऱ्या समस्येवर कायमस्वरुपी तोडगा काढण्यासाठी योग्य ती पावले उचलणे आवश्यक असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. पुरामुळे सध्या नेपाळमधील जनजीवन विस्कळीत झाले आहे. याबद्दल भारताकडून आवश्यक ती सर्व मदत नेपाळला दिली जाईल, असे आश्वासन यावेळी पंतप्रधान यांनी शेर बहादूर देऊबा यांना दिले. नेपाळचे संविधान सर्व समाज घटकांचा विचार करुन तयार केले जाईल, असा विश्वास मोदींनी व्यक्त केला.दोन्ही देशांचे संबंध आणखी दृढ करण्याच्या दिशेने भारताचे प्रयत्न सुरु आहेत. नेपाळच्या विकासात भारताने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली आहे, असे मोदींनी म्हटले. यावेळी त्यांनी भारताकडून दिल्या जात असलेल्या विजेचादेखील उल्लेख केला. भारताकडून नेपाळला केल्या जाणाऱ्या वीज पुरवठ्यात वाढ केली जाणार असल्याची माहिती मोदींनी यावेळी बोलताना दिली.

दोन्ही देशांमध्ये हे झाले आहेत करार -50 हजार घरकुलांच्या निर्मितीसाठी आवश्यक ते सहाय्य भारताच्या वतीने पुरविण्यासंबंधी करारभूकंपामुळे उद्‌ध्वस्त झालेल्या नेपाळमधील शिक्षण संस्थांची नव्याने उभारणी करण्यासाठी मदतीचा करारनेपाळचा सांस्‍कृतिक वारसा जतन करण्यासाठी पुरातन वास्तूंच्या बांधकामाला सहाय्यभूकंपामुळे नेपाळमधल्या आरोग्य क्षेत्राची झालेली हानी भरून काढण्यासाठी वैद्यकीय संस्थांची उभारणी करण्यासाठी सहाय्यमेची सेतु आणि उभय देशांतील रस्ते वाहतूक कार्यक्रमाला प्रोत्साहन देण्यासाठी भारताच्या मदतीचा करारअंमली पदार्थांची तस्करी रोखण्यासाठी उपाययोजना करण्यासंबंधीचा करारमूल्यांकनामध्ये समानता आणण्यासाठी प्रमाणिकरण क्षेत्रात सहकार्य करण्याचा करारभारत आणि नेपाळमधील इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाऊटंटस् यांच्यामध्ये सामंजस्य करार

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदी