नितीन अग्रवाल, नवी दिल्लीनवी दिल्लीत भाजपची परिस्थिती इतकी बिघडली आहे की , मुख्यमंत्रीपदाचीउमेदवार म्हणून ज्या किरण बेदी यांना त्यानी अत्यंत सुरक्षित समजल्या जाणाऱ्या मतदारसंघात उभे केले, तिथेही त्याना पराभवाचा सामना करावा लागला. दिल्लीतील कृष्णानगर हा मतदारसंघ भाजपाच्या दृष्टीने अत्यंत सुरक्षित समजण्यात येतो, कारण भाजपाची ही परंपरागत जागा आहे. तरीही किरण बेदी यांचा येथे पराभव झाला. देशातील पहिली महिला आयपीएस अधिकारी म्हणून ज्यांचे कौतुक होते, त्या बेदी यांचा असा पराभव का झाला? भाजप कायकर्त्यांच्या मते बेदी यांचा दुराभिमान हेच पराभवाचे कारण आहे. निवडणुकीत बेदी यांचा पराभव हा राजकारणातील पराभव मानला जात आहे. या पहिल्या परीक्षत बेदी या नापास झाल्या आहेत. या पराभवानंतर भाजप नेतेही आता बेदी यांच्या विश्वासार्हतेबाबत शंका उपस्थित करत आहेत. १५ जानेवारी रोजी किरण बेदी भाजपच्या दिल्लीतील मुख्यमनत्रीपदाच्या उमेदवार बनल्या, तेव्हापासूनच पक्षात त्यांच्याविरोधी वातावरण होते. बेदी या बाहेरच्या उमेदवार आहेत अशी कार्यकर्त्यांची तक्रार होती. ईशान्य दिल्लीतील भाजप खासदार मनोज तिवारी यांनी बेदी यांना उघड विरोध केला होता. पण तेही नंतर गप्प बसले. कृष्णानगर हा मतदारसंघ भाजप नेता हर्षवर्धन यांचा होता. त्यांच्याशीही बेदी यांचे जमले नाही. पहिल्याच दिवशी बेदीनी हर्षवर्धन यांच्याशी पंगा घेतला. बेदी यांच्या निवासस्थानी बोलावलेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीस हर्षवर्धन थोडे उशिरा आले. त्यांची वाट पाहाण्याची गरज बेदी यांना वाटली नाही. हर्षवर्धन यांनी चतुराईने गोड बोलून आपली बाजू सांभाळून घेतली. पण नात्यात दुरावा यायचा तो आलाच आणि नंतर तर तो वाढतच गेला. त्याचा परिणाम असा झाला की गेल्या निवडणुकीत जिथे हर्षवर्धन यांनी ४३ हजार मतानी विजय मिळविला होता, तिथेच बेदी यांना २३०० मतानी हार पत्करावी लागली.
बेदींच्या पराभवामागे अहंकार
By admin | Updated: February 11, 2015 02:15 IST