शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

सोप्या भाषेत कायदे तयार करण्याचा प्रयत्न : पंतप्रधान

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 24, 2023 06:13 IST

सायबर दहशतवाद आणि विध्वंसक हेतुंसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत चिंता

लोकमत न्यूज नेटवर्कनवी दिल्ली : आपले सरकार समजण्यासाठी सोपे व शक्य तेवढ्या भारतीय भाषांत कायदे बनविण्याचा प्रयत्न करत आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी सांगितले. येथे आंतरराष्ट्रीय वकिलांच्या परिषदेचे उद्घाटन करताना त्यांनी सायबर दहशतवाद व मनी लाँड्रिंगसह विध्वंसक हेतूंसाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत चिंता व्यक्त केली. हे धोके सीमा किंवा अधिकार क्षेत्र वगैरे काही पाहत नाहीत. त्यांना सामोरे जाताना विविध देशांच्या कायदेशीर चौकटींत संयुक्त प्रयत्नांची गरज आहे. धोका जागतिक असतो, तेव्हा सामोरे जाण्याची पद्धतही जागतिक असावी, असे ते म्हणाले.

हवाई प्रवास सुनिश्चित करण्यासाठी सर्व देशांच्या वाहतूक नियंत्रण यंत्रणेतील सहकार्याचे उदाहरण देत ते म्हणाले की, धोक्यांना सामोरे जाण्यासाठी जागतिक व्यवस्था लागणार आहे. मात्र, हे एका सरकारचे किंवा देशाचे काम नाही. कायदेशीर व्यवस्थेवर भाष्य करताना ते म्हणाले की, कायदे लिहिण्यासाठी व न्यायालयीन प्रक्रियेत वापरली जाणारी भाषा न्याय सुनिश्चित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावते.

तुमच्या भाषेत असावासरकारमधील आम्ही मंडळी असा विचार करतो की, कायदा दोन पद्धतीने तयार केला जावा. एक कायद्याच्या मसुदा तुमच्या नेहमीच्या भाषेतील असेल आणि दुसरा मसुदा देशातील सामान्य माणसालाही समजेल, अशा भाषेत असेल. त्याला स्वत:ला तो कायदा समजून घेता यायला हवा. कायद्याचा मसुदा जटिल पद्धतीने तयार करण्याचे प्रचलन सध्या सुरु आहे.     - नरेंद्र मोदी, पंतप्रधान

संस्थात्मक सहयोग हाच पुढे जाण्याचा मार्ग : सरन्यायाधीश चंद्रचूडनवी दिल्ली : न्याय मिळवून देण्यासाठी संस्थात्मक सहयोग हाच पुढे जाण्याचा मार्ग आहे, असे सरन्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांनी शनिवारी सांगितले आणि राष्ट्रे, संस्था आणि व्यक्ती यांच्यातील सहभागाची गरज अधोरेखित केली. बार कौन्सिल ऑफ इंडियाच्या दोन दिवसीय 'आंतरराष्ट्रीय वकील परिषद २०२३' च्या उद्घाटन समारंभाला संबोधित करताना ते बोलत होते. न्यायमूर्ती चंद्रचूड म्हणाले की, मतभेद बाजूला ठेवून देशाच्या सेवेत व्यक्ती म्हणून पुढे आले पाहिजे. नुकत्याच संपन्न झालेल्या जी-२० शिखर परिषदेच्या घोषणेप्रमाणे 'वसुधैव कुटुंबकम्' म्हणजे, जग हे एक कुटुंब आहे.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीministerमंत्रीSupreme Courtसर्वोच्च न्यायालय