शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ईडीचे समन्स आता क्यू-आर कोडसह, निपॉन कंपनीच्या नावे बोगस समन्सनंतर निर्णय 

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2022 13:46 IST

ईडीने यासंदर्भात एक प्रसिद्धिपत्रक जारी केले आहे. ईडीकडून प्राप्त माहितीनुसार, बोगस समन्स जारी करत लोकांची लूटमार करणाऱ्या एका टोळीचा ईडीच्या अधिकाऱ्यांनी नुकताच पर्दाफाश केला.

मुंबई : रंगनिर्मिती करणाऱ्या निपॉन कंपनीला ईडीच्या नावे बोगस समन्स पाठवत कंपनीकडून २० कोटी रुपयांची खंडणी उकळण्याचा प्रकार उजेडात आल्यानंतर आता ईडीने (सक्तवसुली संचालनालय) आपल्या समन्सवर क्यू-आर कोड प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. या क्यू-आरकोडमुळे ज्याच्या नावे समन्स आहे, अशा व्यक्तीला तो क्यू-आरकोड स्कॅन करून त्याच्या समन्सची सत्यता पडताळून पाहता येईल.ईडीने यासंदर्भात एक प्रसिद्धिपत्रक जारी केले आहे. ईडीकडून प्राप्त माहितीनुसार, बोगस समन्स जारी करत लोकांची लूटमार करणाऱ्या एका टोळीचा ईडीच्या अधिकाऱ्यांनी नुकताच पर्दाफाश केला. रंगनिर्मितीमधील निपॉन कंपनीला अलीकडे असेच एक बोगस समन्स आले होते. या समन्सनुसार कंपनीच्या संचालकांना मनी लॉड्रिंग कायद्यांतर्गत ईडीच्या दिल्ली येथील कार्यालयात उपस्थित राहण्यास सांगण्यात आले होते. यानंतर, ज्या टोळीने हे समन्स पाठविले होते, त्यांनी कंपनीच्या संचालकांशी संपर्क करत आपली ईडीच्या अधिकाऱ्यांशी चांगली ओळख आहे. प्रकरण मिटविण्यासाठी आपण मदत करू शकतो, असे सांगत त्यांच्याकडे २० कोटी रुपयांची मागणी केली. यानंतर कंपनीने थेट ईडी कार्यालयाशी संपर्क केला आणि ही माहिती दिली. ईडीच्या अधिकाऱ्यांनी आणि दिल्ली पोलिसांनी या कंपनीद्वारे या टोळीशी संपर्क करत त्या टोळीचा म्होरक्या अखिलेश मिश्रा याला दिल्लीस येण्यास सांगितले. मिश्रा दिल्लीला येण्यास तयार झाला आणि कंपनीच्या संचालकांना भेटतेवेळी सरकारी बोधचिन्ह असलेल्या गाडीतून तो आला. त्याने स्वतःची ओळख ईडीचा अधिकारी आहे, अशी सांगितली. तो तिथे येताच ईडी आणि दिल्ली पोलिसांनी त्याला अटक केली. अटक करण्यात आलेला अखिलेश मिश्रा हा मुंबईचा असून, त्याच्यासोबत मुंबई, दिल्ली, बिहार, कोलकाता, गाझीपूर येथून त्याच्या टोळीतील आणखी नऊ आरोपींना अटक करण्यात आली आहे. 

काय आहे क्यू-आर कोड प्रणाली?-  क्यू-आर कोडच्या या प्रणालीनुसार, ईडीच्या कार्यालयातर्फे इलेक्ट्रॉनिक प्रणालीतून संबंधित व्यक्तीला समन्स पाठविले जाईल. -  समन्सवर एक विशिष्ट पासकोड छापलेला असेल. -  ज्यावेळी एखाद्या व्यक्तीला अथवा कंपनीला ईडीकडून समन्स प्राप्त होईल, त्यावेळी त्या समन्सवर असलेला बारकोड मोबाईल फोनमधील कॅमेऱ्याच्या माध्यमातून बघितल्यास त्याद्वारे थेट ईडीच्या वेबसाईटची लिंक ओपन होईल.-  ही लिंक ओपन झाल्यावर समन्सवर छापलेला पासकोड तिथे टाकल्यास संबंधित व्यक्तीला आपल्या समन्सचे पूर्ण तपशील तेथे समजतील.-  ईडीकडून यापुढे प्रत्येक समन्सवर हा क्यू-आर कोड असेल.-  क्यू-आर कोडशिवाय आलेले समन्स हे अधिकृत नसेल, असेही ईडीने स्पष्ट केले आहे. 

टॅग्स :Enforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयMumbaiमुंबई