शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

ईडी ना केजरीवालांच्या घरी छापा टाकणार, ना अटक करणार; वेगळीच रणनिती आखणार?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2024 11:03 IST

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ईडीच्या तिसऱ्या नोटीसीला जुमानलेले नाहीय, यावरून आपने ईडी छापा मारणार व केजरीवालांना अटक करणार असल्याचा दावा करत आहे.

दिल्ली अबकारी घोटळ्यात आज ईडी अरविंद केजरीवाल यांच्या घरी छापे मारणार असल्याचा दावा आपने केला होता. तसेच त्यांना नंतर अटकही करणार असल्याचे म्हटले होते. परंतु, ईडीने केजरीवालांच्या घरी छापा मारणार असल्याची ती अफवा असल्याचे म्हटले आहे. 

दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवाल यांनी ईडीच्या तिसऱ्या नोटीसीला न जुमानता पत्र पाठविले आहे. यामध्ये  आपल्यावर काय आरोप ठेवण्यात आले आहेत आणि कोणते प्रश्न विचारले जाणार आहेत याचे लेखी मागितले आहे. केजरीवालांच्या पत्रावर ईडी विचार करत असल्याचे ईडीशी संबंधीत लोकांनी म्हटले आहे. यानंतर केजरीवाल यांना चौथा समन्स पाठविला जाणार आहे. 

अबकारी घोटाळाप्रकरणी ईडीने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना तीनवेळा नोटीस बजावली होती. तरीही केजरीवाल ईडीसमोर चौकशीला हजर न झाल्याने आता ईडी काय कारवाई करते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 

आज अरविंद केजरीवाल यांच्या घरावर छापा टाकला जाईल आणि त्यांना अटकही केली जाईल, अशी माहिती आम्हाला विश्वसनीय सूत्रांकडून मिळाली आहे. समन्स पाठवण्याची वेळ आणि त्यांना अटक करण्याचा प्लॅन हे लोकसभा निवडणुकीशी संबंधित असल्याचे आता स्पष्ट झाले आहे, असा आरोप आतिशी यांनी केला आहे. आजपर्यंत एक रुपयाही रोख, सोने, चांदी किंवा कोणत्याही प्रकारच्या मालमत्तेची कागदपत्रे जप्त केलेली नाहीत. गेल्या वर्षभरापासून तपास सुरु आहे. मग तीन आठवड्यांत तीन समन्स पाठविण्याची एवढी काय घाई झाली, असा सवालही आतिशी यांनी केला आहे. 

टॅग्स :Arvind Kejriwalअरविंद केजरीवालEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालयAAPआप