शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

पेटीएम, कॅशफ्रीवर ईडीची छापेमारी; १७ कोटींची रक्कम केली जप्त

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 4, 2022 08:08 IST

यासंदर्भात ईडीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, मोबाइल ॲपद्वारे कर्ज देणाऱ्या पेटीएम, कॅशफ्री, रेझरपे या कंपन्यांच्या तसेच कंपनीशी संबंधित अशा सहा ठिकाणी शुक्रवारी आणि शनिवारी ईडीने छापेमारी केली.

मुंबई : मोबाइल ॲपवरून लोकांना कर्ज देणे आणि त्याच्या वसुलीसाठी लोकांची पिळवणूक केल्याप्रकरणी सक्तवसुली संचालनालयाने (ईडी) शनिवारी पेटीएम, कॅशफ्री, रेझरपे या कंपन्यांच्या बंगळुरू येथील कार्यालयांवर छापेमारी केली. या छापेमारीदरम्यान या कंपन्यांच्या खात्यांतील १७ कोटी रुपयांची रक्कमही जप्त करण्यात आली.

यासंदर्भात ईडीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकानुसार, मोबाइल ॲपद्वारे कर्ज देणाऱ्या पेटीएम, कॅशफ्री, रेझरपे या कंपन्यांच्या तसेच कंपनीशी संबंधित अशा सहा ठिकाणी शुक्रवारी आणि शनिवारी ईडीने छापेमारी केली. या कंपन्यांकडून ॲपद्वारे ग्राहकांना कर्ज दिले गेले होते. मात्र, त्याच्या वसुलीसाठी ग्राहकांना ब्लॅकमेलिंग करण्यात आले. मानसिक त्रास देण्यात आला, असा ठपका या कंपन्यांवर  आहे. या कंपन्यांविरोधात बंगळुरूच्या सायबर पोलिसांकडे १८ एफआयआर दाखल आहेत. या एफआयआरच्या अनुषंगानेच या कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांचा तपास ईडीने सुरू केला आहे.

 या कंपन्यांनी काही भारतीयांची ओळखपत्रे, तसेच संबंधित कागदपत्रांचा गैरवापर करत त्यांना कंपनीत संचालक असल्याचे दाखवल्याचाही आरोप आहे. मात्र, या कंपन्यांचे खरे मालक चिनी नागरिक असल्याचेही तपासात उघड झाले आहे.

या कंपन्यांनी कर्जाचा व्यवसाय करतानाही अनेक नियमांचे उल्लंघन केल्याचे ईडीच्या प्राथमिक तपासात पुढे आले आहे. याच अनुषंगाने या कंपन्यांच्या बँक खात्यात असलेली १७ कोटी रुपयांची रक्कम ईडीने जप्त केली आहे.

कर्ज देणाऱ्या ६०० कंपन्यांना नोटिसामोबाइल ॲपद्वारे कर्ज देत ग्राहकांना लुबाडणाऱ्या कंपन्यांवर ईडीने गेल्या दोन महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर कारवाई सुरू केली असून सुमारे ६०० कंपन्यांना आतापर्यंत नोटिसा जारी केल्या आहेत. यातील काही कंपन्यांच्या कारभारात गैरप्रकार झाल्याचे निष्पन्न झाल्यावर ईडीने या कंपन्यांच्या मालमत्ता देखील यापूर्वीच ताब्यात घेतल्या आहेत.

 

टॅग्स :Paytmपे-टीएमEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय