शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

लालू यादव यांच्या निकटवर्तीयांवर ईडीचे छापे, नोकऱ्यांच्या बदल्यात जमीन ‘घोटाळा’प्रकरणी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2023 06:23 IST

केंद्रीय सुरक्षा दलाच्या बंदोबस्तासह दोन डझन ठिकाणांवर छापे टाकण्यात आले.

एस. पी. सिन्हा/विभाष झा

नवी दिल्ली/पाटणा : अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) शुक्रवारी नोकऱ्यांच्या बदल्यात जमीन घोटाळ्याशी संबंधित मनी लाँड्रिंगप्रकरणी बिहारचे माजी मुख्यमंत्री लालूप्रसाद यादव यांच्या तीन मुली तसेच राजद नेत्यांच्या ठिकाणांसह बिहारमधील अनेक शहरांत व इतर ठिकाणी छापे टाकले.  लालूप्रसाद यांच्या मुली रागिणी यादव, चंदा यादव, हेमा यादव व राजदचे माजी आमदार अबू दोजाना यांच्याशी संबंधित पाटणा, फुलवारी शरीफ, दिल्ली-एनसीआर, रांची व मुंबई येथील  ठिकाणांची झडती घेण्यात आली, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. 

सीबीआय आणि ईडी दुसऱ्या कोणाच्या तरी संहितेचे अनुसरण करून विरोधी नेत्यांच्या घरांवर छापे टाकत आहेत. ताजे छापे हे गेल्या ऑगस्टमध्ये बिहारमधील सरकार बदलाची “प्रतिक्रिया” आहे, असा आरोप राजदचे नेते मनोज झा यांनी केला आहे.

दोन डझन ठिकाणी छापेकेंद्रीय सुरक्षा दलाच्या बंदोबस्तासह दोन डझन ठिकाणांवर छापे टाकण्यात आले. लालू यांचे पुत्र व बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव यांच्या दक्षिण दिल्लीतील घराचाही यात समावेश  असल्याचे सांगण्यात आले. तथापि, छाप्याच्या वेळी तेजस्वी यादव तेथे उपस्थित होते की नाही, हे स्पष्ट झाले नाही.

काय आहे प्रकरण ?हे प्रकरण कथितरित्या रेल्वेत नोकऱ्या दिल्याच्या बदल्यात यादव कुटुंब व त्याच्या सहकाऱ्यांना भेट म्हणून किंवा स्वस्त दरात जमिनी दिल्याशी संबंधित आहे. सीबीआयने लालूप्रसाद, त्यांच्या पत्नी व बिहारच्या माजी मुख्यमंत्री राबडी देवींसह अन्य १४ जणांविरुद्ध गुन्हेगारी कट, भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याच्या तरतुदींनुसार आरोपपत्र दाखल केले असून, सर्व आरोपींना १५ मार्च रोजी हजर होण्याचे समन्स बजावण्यात आले आहे.

टॅग्स :Lalu Prasad Yadavलालूप्रसाद यादवEnforcement Directorateअंमलबजावणी संचालनालय